मुख्यपृष्ठ / पाककृती / भाजणी चकली

Photo of Bhajni Chakli by Manisha Lande at BetterButter
1417
7
0.0(0)
0

भाजणी चकली

Nov-10-2018
Manisha Lande
600 मिनिटे
तयारीची वेळ
30 मिनिटे
कूक वेळ
10 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

भाजणी चकली कृती बद्दल

अतिशय सुंदर चविष्ट पदार्थ. आणि चकली या पदार्थाशिवाय दिवाळ सण होऊच शकत नाही. मी एक किलोच्या भाजणीच्या चकल्या केल्या आहेत त्यामुळे मी त्याप्रमाणे साहित्याचे माप दिले आहे.

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • दिवाळी
  • महाराष्ट्र
  • फ्रायिंग
  • स्नॅक्स
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 10

  1. भाजणी साहित्य :
  2. २ वाटी तांदूळ
  3. १ १/२ वाटी चणाडाळ
  4. १/२ वाटी मुगाची डाळ
  5. १/२ वाटी उडीद डाळ
  6. १/४ वाटी साबुदाणा
  7. ५० ग्रॅम जिरं
  8. मुठभर धने
  9. चकली साहित्य :
  10. ४ वाटी चकली भाजणी / पीठ
  11. १ मोठा चमचा लाल तिखट
  12. १/४ छोटा चमचा ओवा
  13. १/४ छोटा चमचा हिंग
  14. १ मोठा चमचा सफेद तीळ
  15. १/२ छोटा चमचा हळद
  16. चवीनुसार मीठ
  17. गरम पाणी आवश्यकतेनुसार
  18. तळण्यासाठी तेल

सूचना

  1. भाजणी कृती :
  2. प्रथम सर्व डाळी, तांदूळ, वेगवेगळं स्वच्छ धुवून घरी फॅनखाली वाळवुन घेतले.
  3. नंतर सर्व जिन्नस वेगवेगळे सोनेरी रंगावर खमंग भाजून घेतले.
  4. नंतर सर्व जिन्नस एकजीव करुन दळुन आणले.
  5. चकली कृती :
  6. प्रथम पीठ मळण्यासाठी पाणी गरम करत ठेवले.
  7. नंतर पीठात लाल तिखट, हळद, ओवा, सफेद तीळ, हिंग,व चवीनुसार मीठ व तेलाचे गरम मोहन घालून त्यात आवश्यकतेनुसार थोडं थोडं गरम पाणी घालुन पीठ मळुन घेतले व १० मिनिटे झाकुन ठेवले.
  8. नंतर चकलीच्या साच्याला आतुन तेलाचे ग्रिसिंग करून घेतले.
  9. कढई गॅसवर ठेवून त्यात तेल घालुन ते गरम करायला ठेवले.
  10. नंतर साच्यात पीठ लंबगोल करुन घालुन चकल्या करून घेतल्या.
  11. गरम तेलात तयार चकल्या सोडून छान सोनेरी रंगावर खमंग तळून घेतल्या
  12. भाजणी चकली रेडी टू सर्व्ह.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर