मुख्यपृष्ठ / पाककृती / गव्हाच्या दरब्याचे लाडू

Photo of Wheat Daraba Ladoo by archana chaudhari at BetterButter
3630
3
0.0(0)
0

गव्हाच्या दरब्याचे लाडू

Nov-11-2018
archana chaudhari
720 मिनिटे
तयारीची वेळ
270 मिनिटे
कूक वेळ
10 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

गव्हाच्या दरब्याचे लाडू कृती बद्दल

घरी बनविलेल्या गव्हाच्या दरब्याचे लाडू अप्रतिम लागतात.

रेसपी टैग

  • व्हेज
  • मध्यम
  • दिवाळी
  • महाराष्ट्र
  • सौटेइंग
  • डेजर्ट
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 10

  1. गहू २ किलो
  2. पिठी साखर १/२ किलो
  3. तूप १/२ किलो
  4. काजू १ वाटी(तुकडा करून भाजलेला)

सूचना

  1. पीठ बनविण्यासाठी- गहू १ तास पाण्यात भिजवून ठेवा.
  2. १ तासानंतर पाणी निथळून घेऊन एका कपड्यात बांधून रात्रभर ठेवा.
  3. सकाळी बांधलेले गहू कपड्यावर वाळत घाला.
  4. छान वाळल्यावर(दाताखाली ठेवल्यास कटकन आवाज यायला हवं)जाडसर दळून आणा.
  5. आता जाडसर चाळणीने चाळून वरील कोंडा काढून घ्या.
  6. आता मध्यम चाळणीने चाळून वरील कोंडा काढून घ्या.
  7. आता अगदी बारीक चाळणीने चाळून वरील कोंडा काढून घ्या.
  8. पीठ तयार आहे.
  9. कोंडा देखील सुपाने पाखडून घेऊन रवा काढून घ्या.
  10. वरील पीठ १ किलो मोजून घ्या.
  11. कढईत १/२ किलो तुपामध्ये १ किलो वरील पीठ घालून मंद आचेवर खरपूस भाजून घ्या.
  12. ३ टेबलस्पून रवा पण भाजून घ्या.
  13. छान भाजून झाल्यावर,गार करण्यासाठी ४ तास थंड होण्यासाठी ठेवा.
  14. आता त्यात पिठीसाखर घालून मळून घ्या.
  15. काजू घाला.
  16. लाडू बनवा.
  17. छान घरच्या पीठाचे दरब्याचे लाडू तयार आहेत.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर