मुख्यपृष्ठ / पाककृती / दाल फ्राय रेस्टॉरंट स्टाईल

Photo of Dal Fry Restaurant Style by Anil Pharande at BetterButter
766
0
0.0(0)
0

दाल फ्राय रेस्टॉरंट स्टाईल

Nov-11-2018
Anil Pharande
10 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
5 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

दाल फ्राय रेस्टॉरंट स्टाईल कृती बद्दल

या माझ्या रेसिपीने अगदी हुबेहूब ढाबा स्टाईल दाल फ्राय तुम्ही घरी करू शकता

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • एव्हरी डे
  • महाराष्ट्र
  • प्रेशर कूक
  • फ्रायिंग
  • सौटेइंग
  • अकंपनीमेंट
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 5

  1. तूर डाळ 3/4
  2. पाणी 3 कप
  3. साजूक तूप 1 टीस्पून
  4. मोहरी 1 टीस्पून
  5. जिरे 1 टीस्पून
  6. सुकी लाल मिरची 1 नग
  7. कढीलिंब 7 ते 8 पाने
  8. हिंग चिमूटभर
  9. कांदा 1 बारीक चिरून
  10. आले लसूण पेस्ट 1 टीस्पून
  11. हिरवी मिरची 1 उभी चिरून
  12. हळद 1/4 टीस्पून
  13. काश्मिरी लाल मिरची पावडर 1 टीस्पून
  14. धने पावडर 1/2 टीस्पून
  15. टोमॅटो 1 बारीक चिरून
  16. गरम मसाला 1/4 टीस्पून
  17. कोथिंबीर 1 टेबलस्पून चिरून
  18. कसुरी मेथी 1 टीस्पून
  19. मीठ चवीप्रमाणे

सूचना

  1. ढाबा स्टाईल दाल फ्राय करण्यासाठी ३/४ कप धुतलेली तूर डाळ व ३ कप पाणी कुकरमध्ये घेऊन ५ शिट्ट्या देऊन डाळ शिजवून घेणे
  2. पॅनमध्ये १ टेबलस्पून साजूक तूप गरम करून मोहरी १ टीस्पून, जिरे १ टीस्पून, सुकी लाल मिरची मधून तोडून व चिमूटभर हिंग, कढीलिंबाची ७ ते ८ पाने घालून फोडणी करून घेणे,
  3. त्यात १ बारीक चिरलेला कांदा घालून रंग बदलेपर्यंत १ मिनिट परतून घेणे, १ टीस्पून आले लसूण पेस्ट घालणे, १ हिरवी मिरची उभी चिरून घालणे, व परतून घेणे,
  4. १/४ चमचा हळद पावडर, १ चमचा काश्मिरी लाल मिरची पावडर, १/२ चमचा धने पावडर छान सुगंध येईपर्यंत परतणे,
  5. १ बारीक चिरलेला टोमॅटो घालणे व झाकण ठेवून मऊ शिजवून घेणे,
  6. शिजलेली डाळ जाळीच्या विस्करने घोटून घेणे व ही डाळ पॅनमध्ये केलेल्या मसाल्यामध्ये घालणे,
  7. थोडे पाणी घालणे, ५ मिनिट मंद आचेवर झाकण ठेवून शिजू देणे,
  8. १/४ चमचा गरम मसाला, १ टीस्पून कसुरी मेथी हाताने चुरडून व चिरलेल्या कोथिंबीरने गार्निश करणे, व जिरा राईस बरोबर सर्व्ह करणे

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर