मुख्यपृष्ठ / पाककृती / भाजणीची चकली

Photo of Bhajnichi Chakli by archana chaudhari at BetterButter
1605
3
0.0(0)
0

भाजणीची चकली

Nov-11-2018
archana chaudhari
720 मिनिटे
तयारीची वेळ
90 मिनिटे
कूक वेळ
10 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

भाजणीची चकली कृती बद्दल

या प्रमाणे चकली केल्यास अप्रतिम....सुंदर...खुसखुशीत अशी चकली १००% होणारच!!

रेसपी टैग

  • व्हेज
  • कठीण
  • दिवाळी
  • महाराष्ट्र
  • फ्रायिंग
  • सौटेइंग
  • स्नॅक्स
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 10

  1. तांदूळ ४कप
  2. हरभरा डाळ २कप
  3. मूग डाळ १ कप
  4. उडीद डाळ १ कप
  5. तूर डाळ १/२ कप
  6. साबुदाणा १/४ कप
  7. पोहे १/४ कप
  8. धणे १/२ कप
  9. चकलीसाठी
  10. भाजणी पीठ ४ कप
  11. ओवा १/२ टेबलस्पून
  12. तिखट १ टेबलस्पून
  13. पिवळे तिखट १/२ टेबलस्पून
  14. तीळ १ टेबलस्पून
  15. तेल टेबलस्पून
  16. मीठ चवीनुसार
  17. तेल तळण्यासाठी

सूचना

  1. भाजणीसाठी दिलेले तांदूळ, डाळी वेगवेगळ्या धुऊन रात्रभर कपड्यावर वेगवेगळे वाळवा.
  2. सकाळी सगळे साहित्य मंद गॅसवर वेगवेगळे खरपूस भाजून घ्या.
  3. साबुदाणा,पोहे,धणे पण भाजून घ्या.
  4. गार झाल्यावर पीठ बनवून घ्या.
  5. आता एका भांड्यात २ कप पाणी उकळा.
  6. उकळलेल्या पाण्यात, दोन्ही तिखट,मीठ,तेल,घाला आणि गॅस बंद करा.
  7. त्यात ४ कप भाजणीचे पीठ घाला.
  8. ओवा,तीळ घाला.
  9. गार झाल्यावर थोडा भाग घेऊन त्यात पाणी टाकुन गोळा बनवून घ्या.(सगळे एकत्र भिजवू नका)
  10. चकलीच्या साच्याला तेल लावून त्यात वरील गोळा भरा.
  11. तेल गरम करायला ठेवा.
  12. चकल्या बनवून घ्या.
  13. मंद आचेवर तेलात चकल्या खरपूस बनवून घ्या.
  14. भाजणीच्या खरपूस चकल्या तयार आहेत.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर