मुख्यपृष्ठ / पाककृती / रवा-बेसन-चोको कुकीज इन प्रेशर कुकर

Photo of Rava-Besan-Choco Cookies In Pressure Cooker by Manisha Lande at BetterButter
417
4
0.0(0)
0

रवा-बेसन-चोको कुकीज इन प्रेशर कुकर

Nov-11-2018
Manisha Lande
20 मिनिटे
तयारीची वेळ
35 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

रवा-बेसन-चोको कुकीज इन प्रेशर कुकर कृती बद्दल

खुप टेस्टी आणि यम्मी लागतात या कुकीज आणि दिवाळ सणासाठी एकदम परफेक्ट आहेत.

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • दिवाळी
  • महाराष्ट्र
  • रोस्टिंग
  • प्रेशर कूक
  • डेजर्ट

साहित्य सर्विंग: 4

  1. १ वाटी बेसन
  2. १ वाटी रवा
  3. ३ वाटी पीठी साखर
  4. ३/४ वाटी साजुक तुप
  5. १/२ छोटा चमचा बेकिंग पावडर
  6. चिमुटभर बेकिंग सोडा
  7. चिमुटभर मीठ
  8. काजू तुकडे सजावटीसाठी
  9. चोको चिप्स सजावटीसाठी ( मी डेअरी मिल्क चॉकलेट वापरले आहे )

सूचना

  1. प्रथम रवा मिक्सरमधून बारीक पावडर करून घेतला.
  2. एका पसरट परातीत रवा, बेसन, बेकिंग पावडर, मीठ, आणि पीठी साखर घालून सर्व मिश्रण छान एकजीव करून घेतले.
  3. नंतर त्यात थोडं थोडं तुप व बेकिंग सोडा घालून नरम पीठ मळुन घेतलं आणि अर्धा तास झाकून ठेवले.
  4. कुकरच्या झाकणाची शिट्टी व रिंग काढून ठेवली.
  5. कुकरचे झाकण बंद करून कुकर गॅसवर ठेवून मोठया आचेवर ५ मिनिटे कुकर प्रिहीट करुन घेतला.
  6. अर्धा तासानंतर ईडली पात्राच्या सर्व खाच्यांना तुपाचा हात लावून व थोडासा मैदा भुरभुरून घेतला.
  7. मळलेल्या पीठाचे मध्यम आकाराचे गोळे करून वरुन काजूचे तुकडे व चॉकलेटचे तुकडे लावून घेतले.
  8. तयार गोळे ईडली पात्रात एक एक ठेवले. ( शेवटचा ईडली पात्राचा संपूर्ण खाचा मोकळाच ठेवायचा कारण त्यावर जर कुकीज भाजायला ठेवल्या तर जळुन करपायची शक्यता असते. )
  9. प्रेशर कुकरमध्ये कुकरची जाळी ठेवुन त्यात ईडली पात्र ठेवले.
  10. कुकरचे झाकण बंद करून गॅसवर ठेवून ५ मिनिटे मोठया आचेवर ठेवले, नंतर मंद ते मध्यम आचेवर ३० मिनिटे कुकीज भाजून घेतल्या.
  11. "रवा-बेसन-चोको कुकीज इन प्रेशर कुकर" खायला तयार.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर