Photo of Baklava by Deepa Gad at BetterButter
1371
8
5.0(1)
1

Baklava

Nov-11-2018
Deepa Gad
0.1 मिनिटे
तयारीची वेळ
90 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • दिवाळी
  • ग्रीक
  • डेजर्ट

साहित्य सर्विंग: 4

  1. दीड कप मैदा
  2. बटर १ छोटी वाटी
  3. मीठ चिमूटभर
  4. बेकिंग पावडर १/२ च
  5. दूध ३/४ कप
  6. साखर १ कप
  7. पाणी ३/४ कप
  8. वेलचीपूड
  9. पिस्त्याची बारीक पावडर १/२ कप
  10. कॉर्नफ्लोर १/२ वाटी

सूचना

  1. मैदा, बेकिंग पावडर, मीठ, बटर गरम केलेलं २ च घालुन एकजीव करा
  2. त्यात दूध घालून मळून घ्या
  3. झाकून १५ मिनिटे ठेवा
  4. पिस्ता मिक्सरमध्ये बारीक पूड करून घ्या
  5. साखर, पाणी, वेलचीपूड एकत्र करून एकतारी पाक कऊन घ्या
  6. पिठाचे ३ गोळे करा, त्यातल्या प्रत्येक गोळ्यांचे ४ छोटे छोटे गोळे करा
  7. एकेक गोळा घेऊन मैदा लावून पातळ पोळी लाटा व केकटीनच्या आकाराचे कापून घ्या
  8. असे सर्व गोळेे लाटून घ्या एकावर एक पोळ्या ठेवताना त्यावर मैदा भुरभुरा म्हणजे एकमेकाला चिकटणार नाहीत
  9. मायक्रोवेव्ह १८० डिग्री सेल्सिअसला १० मिनिटे प्रीहीट करायला ठेवा
  10. केक टिनला विताळलेले बटर ब्रशने लावा त्यावर लाटलेली एक पोळी ठेवा
  11. पोळीवर ब्रशने बटर लावून कॉर्नफ्लोअर भुरभुरा अशाप्रकारे ४ पोळ्या एकावर एक लावून घ्या
  12. आता पिस्त्याची पावडर त्यावर पसरा
  13. परत त्यावर वरीलप्रमाणेच ४ पोळ्याचा लेअर लावा व पिस्त्याची पावडर पसरा व परत ४ पोळ्यांचा लेयर लावा (प्रत्येक पोळीला बटर लावुन कॉर्नफ्लोअर भुरभरायचे)
  14. शेवटी सुरीने वड्या पाडा
  15. वरून राहिलेलं बटर लावून घ्या
  16. मायक्रोवेव्ह मध्ये ठेवून १८० डिग्री सेल्सिअसला ३५ मिनिटे बेक करा
  17. बाहेर काढल्यानंतर त्यावर साखरेचा पाक घाला व प्रत्येक वडीवर पिस्त्याने सजवा
  18. तयार आहे टर्किश बकलावा

रिव्यूज (1)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
Sharwari Vyavhare
Nov-13-2018
Sharwari Vyavhare   Nov-13-2018

Super

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर