मुख्यपृष्ठ / पाककृती / करंजी

Photo of Karanji by Manisha Lande at BetterButter
0
5
0(0)
0

करंजी

Nov-11-2018
Manisha Lande
30 मिनिटे
तयारीची वेळ
30 मिनिटे
कूक वेळ
5 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

करंजी कृती बद्दल

आपला पारंपरिक चविष्ट पदार्थ ज्याशिवाय दिवाळी चा फराळ पुर्णच होत नाही.

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • दिवाळी
  • महाराष्ट्र
  • फ्रायिंग
  • डेजर्ट
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 5

  1. ४ वाटी मैदा
  2. ४ वाटी बारीक रवा ( करंजीची पारी व सारण मिळुन माप दिलं आहे )
  3. ३ वाटी पीठी साखर
  4. १ वाटी सुक्या खोबर्याचा चव
  5. २ मोठे चमचे सफेद तीळ
  6. काजू-बदाम-पिस्ता तुकडे आवडीनुसार
  7. १/२ छोटा चमचा वेलची पूड
  8. चवीनुसार मीठ
  9. तळण्यासाठी व मोहन करण्यासाठी तेल

सूचना

  1. प्रथम रवा छान गडद सोनेरी रंगावर भाजून घेतला.
  2. सुक्या खोबरयाचा किस सोनेरी रंगावर खरपूस भाजून घेतला.
  3. तीळ भाजून घेतले.
  4. नंतर एका मोठ्या पसरट भांड्यात भाजलेला रवा, भाजलेले तीळ, भाजलेलं सुक्या खोबरयाचा किस, चिमूटभर मीठ, काजू-बदाम-पिस्ता तुकडे एकत्र करून घेतले.
  5. नंतर त्यात पीठी साखर घालून सर्व मिश्रण छान एकजीव करून घेतले व करंजीचे पुरण / सारण / चुरण तयार केले.
  6. तयार सारण / पुरण / चुरण
  7. मैद्यात रवा, चवीनुसार मीठ व तेलाचे कडकडीत मोहन घालुन त्यात थोडं थोडं पाणी घालुन घट्ट पीठ मळुन घेतले व १ तास ओल्या कपडयात झाकून ठेवले.
  8. तासाभराने तयार पीठाचे छोटे गोळे करून लाटून त्यात तयार सारण भरून चिरण्याने करंजी करून घेतल्या व ओल्या कपडयाखाली झाकून ठेवल्या.
  9. कढईत तेल गरम करत ठेवले.
  10. तेल तापल्यावर त्यात तयार करंजी हळुवार सोडून मंद आचेवर छान हलक्या सोनेरी रंगावर खमंग तळुन घेतल्या.
  11. "करंजी" तयार.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर