मुख्यपृष्ठ / पाककृती / गुलाबजाम पणती

Photo of Gulabjam Diya by Manisha Lande at BetterButter
439
3
0.0(0)
0

गुलाबजाम पणती

Nov-11-2018
Manisha Lande
5 मिनिटे
तयारीची वेळ
25 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

गुलाबजाम पणती कृती बद्दल

सहजच सुचलेला आणिक घरात उपलब्ध असलेल्या जिन्नसांपासुनच तयार केलेला यम्मिलीशयस पदार्थ जो खास दिवाळी च्या पाडव्याला बनवला आणि घरी सर्वांना आवडला.

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • दिवाळी
  • महाराष्ट्र
  • फ्रायिंग
  • डेजर्ट
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

  1. १ वाटी मिल्क पावडर
  2. १/२ वाटी कोमट दुध
  3. १ वाटी साखर
  4. ३ वाटी पाणी
  5. चिमुटभर मीठ
  6. ३ ते ४ बदाम
  7. ६ ते ७ केशर काड्या
  8. १/४ छोटा चमचा वेलची पूड

सूचना

  1. प्रथम मिल्क पावडर मध्ये आवश्यकतेनुसार थोडं थोडं कोमट दुध घालून छान एकजीव करून मळुन त्याचा मऊसर घट्ट गोळा बनवून घेतला.
  2. एका पसरट भांड्यात १ वाटी साखर व ३ वाटी पाणी घालुन थोडा दाटसर पाक करून घेतला.
  3. पाकात वेलची पूड व केशर काड्या घातल्या.
  4. बदामाचे मधुन दोन समान भाग करून घेतले.
  5. थोडं गरम पाणी करून त्यात ६ ते ७ केशर काड्या घातल्या व त्यात बदामाचे काप घालून ठेवले.
  6. तयार पीठाचे मध्यम आकाराचे गोळे करून त्याला पणती चा आकार देऊन सर्व पणती बनवून घेतल्या.
  7. कढईत तेल गरम करत ठेवले.
  8. तेल गरम झाल्यावर त्यात तयार पणती मंद आचेवर छान गडद सोनेरी रंगावर तळून घेतल्या.
  9. तयार गरम पाकात एक एक करून सर्व पणती मुरवून घेतल्या.
  10. नंतर तयार पणती सर्व्हींग डिशमध्ये काढून वरून केशराच्या पाण्यात भिजवून ठेवलेले बदामाचे काप अॅज अ दिव्याची वात म्हणून लावून सर्व्ह केले.
  11. "गुलाबजाम पणती" ईज रेडी टू सर्व्ह.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर