Photo of Donut by Madhumati Shinde at BetterButter
1012
3
0.0(0)
0

डोनट

Nov-11-2018
Madhumati Shinde
15 मिनिटे
तयारीची वेळ
1 मिनिटे
कूक वेळ
6 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

डोनट कृती बद्दल

हेल्दी आणि प्रोटीन युक्त

रेसपी टैग

  • डेजर्ट
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 6

  1. अर्धा किलो मैदा, चार अंडी, एक कप तुप, चमचाभर दालचीनी पावडर, चमचाभर बेकिंग पावडर, वेलची पूड अर्धा चमचा, किंचित मीठ, तळण्यासाठी तेल किंवा तूप.
  2. साखर अर्धा किलो

सूचना

  1. प्रथम साखर वाटून पावडर करून घेणे. एका बाऊल मध्ये मैदा चाळुन घ्या त्यात बेकिंग पावडर चमचाभर दालचीनी पावडर चमचाभर किंचित मीठ, वेलची पूड घालून चांगले एकजीव करुन घ्यावे. नंतर तुप कडकडीत गरम करून घालावे व मिसळून घ्यावे. आता साखरेची पावडर केली आहे त्या पावडर मधील एक वाटी पावडर बाजूला काढून बाकी सर्व पावडर मिश्रणात घालून एकेक अंड फोडून त्यात घालून मिसळून घ्यावे व मऊसर गोळा मळून अर्धा तास झाकून ठेवावे. नंतर ते पीठ हलकं आणि जाळीदार होत. ते पुन्हा मळून घ्यावे व त्याचे लहान लहान गोळे करून एकेका गोळयाची एक सेमी जाडीची पुरी लाटून मध्यभागी बिसलरी बाटली चे झाकण ठेवून दाबून होल करून घ्यावे.असे सर्व चपटे गोळे होल पाडून तयार झाले की गरम तुपावर क्रिमी रंगावर तळून घ्यावे. नंतर तळलेले डोनट थंड झाल्यावर सुरवातीला वाटीभर साखरेची पावडर काढली होती त्या पावडर मध्ये एकेक डोनट घोळवून घेतले की डोनट तयार.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर