Photo of Anarase by Madhumati Shinde at BetterButter
1468
2
0.0(0)
0

अनारसे

Nov-11-2018
Madhumati Shinde
30 मिनिटे
तयारीची वेळ
20 मिनिटे
कूक वेळ
5 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

अनारसे कृती बद्दल

दिवाळी निमित्त पारंपारिक

रेसपी टैग

  • दिवाळी
  • महाराष्ट्र
  • लो फॅट

साहित्य सर्विंग: 5

  1. तांदूळ एक वाटी, गुळ पाऊण वाटी खसखस पाव वाटी वेलची पूड लहान चमचा,तळण्यासाठी तेल.

सूचना

  1. तांदूळ सलग तीन दिवस भिजवून घ्यावे पाणी दररोज सकाळी बदलले पाहिजे म्हणजे आंबट वास येणार नाही. चौथ्या दिवशी भिजवून घेतलेले तांदूळ सावलीत पाणी गाळून सुकवावे. तासभर सुकले की मिक्सरमध्ये बारीक वाटून घेणे. नंतर चाळुन पुन्हा जाडसर असलेले बारीक वाटून घ्यावे. नंतर गुळ किसणीवर किसून घ्यावा खडे ( गुळाचे) राहणार नाहीत. एका बाऊल मध्ये तांदूळ पीठ आणि गुळ हातानेच चांगले एकजीव करुन घ्यावे. व थोडे थोडे मिक्सरमध्ये लहान भांड्यात पुन्हा फिरवून घ्यावे.फिरवत असताना वेलची पूड घालून फिरवून घ्यावे. आता हे पीठ अगदी मऊ होईल. मग छोटे छोटे गोळे करून एकेक गोळा पोळपाटाला तेल लावून खसखसीमधे घोळवून हलकेच थापून घ्यावे तेल गरम होईपर्यंत चारपाच अनारसे थापून होतात. गॅस मंद आचेवर ठेवून अनारसे तळून घ्यावेत.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर