मुख्यपृष्ठ / पाककृती / सिमला करंजी माय इनोव्हेशन

Photo of Simala karanji my innovation by Chayya Bari at BetterButter
539
6
0.0(0)
0

सिमला करंजी माय इनोव्हेशन

Nov-11-2018
Chayya Bari
20 मिनिटे
तयारीची वेळ
30 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

सिमला करंजी माय इनोव्हेशन कृती बद्दल

काल मैत्रिणी फराळाला आल्या गोड अजिबात नको तिखट फराळ दे मग विचार केला शेव,चिवडा,चकली नेहमीचच मग इनोव्हेटिव्ह करू यात मग बनवली चटपटीत सिमला करंजी

रेसपी टैग

  • व्हेज
  • कठीण
  • दिवाळी
  • महाराष्ट्र
  • फ्रायिंग
  • सौटेइंग
  • स्नॅक्स
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

  1. पारीसाठी -मैदा 2 वाट्या
  2. रवा 2चमचे
  3. ओवा 2चिमूट
  4. मीठ चवीनुसार
  5. गरम तेल 2चमचे मोहन
  6. सारण- सिमला मिरची 4
  7. कांदा 1
  8. बेसन 4चमचे
  9. जिरे,मोहरी,हिंग, फोडणीसाठी
  10. आले लसूण पेस्ट 1/2चमचा
  11. तिखट 1 चमचा
  12. गरम मसाला 1/2चमचा
  13. मीठ चवीनुसार
  14. हळद 1/2चमचा
  15. बारीक शेव
  16. पंढरपुरी डाळ 4 चमचे
  17. तेल तळण्यासाठी
  18. चिंचेची चटणी सर्व्हिंग साठी

सूचना

  1. प्रथम मैद्यात रवा,मीठ,ओवा ,गरम तेलाचे मोहन घालून मिक्स करा व कोमट पाण्याने घट्ट मळून झाकून ठेवा
  2. आता तेल तापवून जिरे,मोहरी,हिंगाची फोडणी करा त्यात कांदा परतून घ्या
  3. आता आले लसूण पेस्ट परतून घ्या तिखट मीठ,हळद ,गरम मसाला,घालून मिक्स करा आता बारीक चिरलेली सिमला मिरची घालून मिक्स करा झाकण घालून वाफ घ्या
  4. मिरची बोटाने दाबून बघा मवू झाली पाहिजे
  5. आता बेसन घालून मिक्स करा व मंद गॅसवर झाकण ठेवून शिजवा अधूनमधून हलवा
  6. मिश्रण कढईपासून सुटू लागले की उतरून घ्या
  7. आता डाळ 1/2 चमचा तेल,मीठ,तिखट घालून 2 मिनिटे परतून उतरून घ्या
  8. याप्रमाणे तयारी करा
  9. आता मिरचीत शेव,डाळ मिक्स करा सारण तयार
  10. भिजवलेल्या मैद्याची पारी लाटून करंजी साच्यात ठेवून सारण भरा
  11. करंजी बंद करून काढून घ्या
  12. याप्रमाणे करंज्या भरून घ्या
  13. गरम तेलात सोडून नंतर मंद गॅसवर खरपुस तळा साच्या डिझाईन चा होता पण तळताना करंजी फुगल्यावर डिझाईन दबले गेले
  14. सर्व करंज्या तळून घ्या
  15. सर्व्ह करताना वर चिंचेची चटणी,शेव,घालून सर्व्ह करा खूपच चविष्ट लागली सर्वच खुश

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर