Photo of Saran puri by Rohini Rathi at BetterButter
1493
3
0.0(0)
0

सारण पुरी

Nov-11-2018
Rohini Rathi
555 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

सारण पुरी कृती बद्दल

रव्यामध्ये गुळाचे पाणी घालून सारण बनवून मैदाच्या पारीमध्ये स्टॉप केलेली ही सारंन पुरी दिवाळी सणासाठी महाराष्ट्रात विशेष करून घडवली जाते

रेसपी टैग

  • Tossing (Mixing with a spoon / spatula)
  • व्हेज
  • सोपी
  • दिवाळी
  • महाराष्ट्र
  • फ्रायिंग
  • सौटेइंग
  • स्नॅक्स
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. सारंग बनवण्यासाठी
  2. रवा एक कप
  3. गुळ एक कप
  4. वेलची पूड 1 तीस्पून
  5. किसलेले खोबरे दोन चमचे
  6. पारी बनवण्यासाठी
  7. मैदा अर्धा कप
  8. ते तेल 1 टेबल स्पून
  9. तूप तळण्यासाठी

सूचना

  1. गुळामध्ये थोडेसेच पाणी घालून गूळ विरघळून घ्यावा
  2. नंतर ते पाणी गाळणीने गाळून घ्यावे
  3. मंद आचेवर रवा भाजून घ्यावा
  4. रवा थंड झाल्यानंतर त्यात वेलची पूड किसलेले खोबरे घालून सारण बनवून घ्यावे
  5. नंतर सारण पाच ते सहा तास भिजवून द्यावे
  6. पाच ते सहा तासानंतर सारण पूर्ण मोकळे करून घ्यावे
  7. आवरण बनवण्यासाठी मैदा मध्ये तेलाचे मोहन घालून घट्ट पीठ मळून घ्यावे
  8. नंतर पिठाची पोळी लाटून घ्यावी
  9. याचप्रमाणे दुसरी पोळी लाटून घ्यावी
  10. एका पोळीवर दोन ते तीन चमचे सारण घालावे
  11. नंतर दुसरी पोळी वरतून ठेवावे व सर्व बाजूने कडा दाबून बंद करून घ्यावे
  12. पोळी वरती वाटी ठेवून आजूबाजूने कटरच्या साह्याने तुम्ही आकार देऊन घ्यावा
  13. अशाच प्रकारे सर्व सारन पुऱ्या बनवून घ्याव्यात व दहा ते पंधरा मिनिटे सुकून द्याव्यात
  14. कढईमध्ये तूप गरम करून तळून घ्याव्यात
  15. थंड झाल्यानंतर हवाबंद डबे मध्ये भरून सारण पुरी सर्व करावी

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर