मुख्यपृष्ठ / पाककृती / रव्याचा जाळीदार केक ईन प्रेशर कुकर

Photo of Gahu Pith-Ravyacha Jalidar Cake In Pressure Cooker by Manisha Lande at BetterButter
689
6
0.0(0)
0

रव्याचा जाळीदार केक ईन प्रेशर कुकर

Nov-11-2018
Manisha Lande
5 मिनिटे
तयारीची वेळ
40 मिनिटे
कूक वेळ
8 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

रव्याचा जाळीदार केक ईन प्रेशर कुकर कृती बद्दल

दिवाळीला आमचे फ्रेंडस जेवायला आले तेव्हा हा केक मी जेवणानंतर सर्वांना सर्व्ह केला आणि त्यांना तो खुपच आवडला. दिवाळीला केक करायचा नाही असं काही नाही बाकीच्या मिठाई आपण बनवून खातोच पण सहसा केक कोणी करत नाही. मी बनविला आणि सर्वांना आवडलाही.

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • दिवाळी
  • महाराष्ट्र
  • बेकिंग
  • डेजर्ट
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 8

  1. १ वाटी बारीक रवा
  2. ३/४ वाटी साजुक तुप
  3. २ वाटी पीठी साखर
  4. ३/४ वाटी फेटलेलं दही
  5. ३/४ वाटी दुध
  6. १ छोटा चमचा बेकिंग पावडर
  7. १/४ छोटा चमचा बेकिंग सोडा
  8. चिमुटभर मीठ
  9. काजू सजावटीसाठी

सूचना

  1. प्रथम रवा मिक्सरमधून बारीक करून घेतला.
  2. एका पसरट भांड्यात साजुक तुप व पीठी साखर घालून सर्व मिश्रण छान हलके होईपर्यंत फेसुन घेतले.
  3. नंतर त्यात थोडा थोडा रवा व चिमूटभर मीठ घालून छान एकजीव करून घेतला.
  4. नंतर त्यात फेटलेलं दही, दुध घालून छान एकजीव करून घेतले व थोडावेळ झाकून ठेवले.
  5. प्रेशर कुकरची शिट्टी व रिंग काढून त्याचे झाकण लावून कुकर मोठ्या आचेवर ५ मिनिटे प्रिहीट करुन घेतला.
  6. नंतर एका पसरट टिनला तुपाचा हात लावून व त्यावर थोडा मैदा भुरभुरून ग्रिसिंग करून घेतले.
  7. नंतर केकच्या मिश्रणात बेकिंग पावडर व बेकिंग सोडा घालून थोडं फेसुन केकचं मिश्रण टिनमध्ये घालून त्यावर काजू लावुन घेतले.
  8. प्रेशर कुकरमध्ये फक्त कुकरची जाळी ठेवुन त्यावर एक छोटा डबा ठेवला
  9. त्यावर केकच्या मिश्रणाचा टिन ठेवून कुकरचे झाकण बंद करून गॅसवर ठेवून आधी मोठया आचेवर ५ मिनिटे आणि नंतर मंद ते मध्यम आचेवर ३५ मिनिटे केक भाजून घेतला.
  10. केक थंड झाल्यावर सर्व्हींग डिशमध्ये काढून सर्व्ह केला.
  11. "रव्याचा जाळीदार केक ईन प्रेशर कुकर" इज रेडी टू सर्व्ह.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर