मुख्यपृष्ठ / पाककृती / लिटिलहार्टस सीताफळ अनारसे

Photo of Littlehearts Sitafal Anarse by Vaishali Joshi at BetterButter
922
8
0.0(0)
0

लिटिलहार्टस सीताफळ अनारसे

Nov-11-2018
Vaishali Joshi
312 मिनिटे
तयारीची वेळ
0 मिनिटे
कूक वेळ
5 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

लिटिलहार्टस सीताफळ अनारसे कृती बद्दल

अनारसे सगळयानाच आवडतात आणि गरम अनारसे तर विकपॉईँटच असतो . त्याला थोडा ट्विस्ट देऊन सीताफळ फ्लेवर चे अनारसे करून बघितले तर काय ? प्रयत्न एकदम सक्सेसफुल झाला आणि सगळे खुप खुश झाले .सीताफळ ची खुप छान टेस्ट येते .

रेसपी टैग

  • व्हेज
  • कठीण
  • दिवाळी
  • महाराष्ट्र
  • फ्रायिंग
  • डेजर्ट
  • एग फ्री

साहित्य सर्विंग: 5

  1. अनारस्याची उंडी साठी - तांदुळ १/२ किलो
  2. साखर ४०० ग्राम ( जितके तांदुळ घेऊ त्यापेक्षा थोड़ी कमी साखर घ्यावी )
  3. अनारसे बनविताना साहित्य -उंडी २ कप
  4. साजुक तूप
  5. सीताफळा चा गर २ चमचे
  6. खसखस लागेल तेवढी

सूचना

  1. तांदुळ ३ दिवस पाण्यात भिजत घालावे आणि त्याचे पाणी रोज बदलावे .
  2. चौथ्या दिवशी तांदुळ पाण्यातुन उपसून सूती कापडावर १/२ तास सावलीत पसरवून ठेवावे
  3. तांदुळ सुकले की मिक्सर मधे बारीक़ वाटत जावे आणि बारीक़ चाळनीने चाळत जावे . ही प्रक्रिया पुर्णपणे बारीक़ होईस्तोवर करावी .
  4. साखर मिक्सर मधे बारीक़ द्ळून पीठी साखर करून घ्यावी
  5. पीठी साखर आणि बारीक़ केलेली तांद्ळा चे पीठ हाताने चोळूुन चोळून एकजीव करावे आणि त्याचे मोठे मोठे लाडू बांधून हवाबंद डब्यात ८-१० दिवस ठेवून द्यावे ..(डबा फ्रिज मधे ठेऊ नये )
  6. ही आपली उंडी तयार झाली , अनारसे करताना लागेल तेवढी उंडी घ्यावी
  7. २ कप उंडी घेवुन त्यात १ चमचा साजुक तूप आणि २ चमचे सीताफळाचा गर घालून एकत्र करा आणि किंचित दूध (गरज वाटल्यास )टाकुन गोळा भिजवून घ्या
  8. छोटे छोटे गोळे करून पेपर वर खसखस पसरवून त्यावर अनारसे थापुन घ्या
  9. थापलेले अनारसे हार्ट शेप च्या मोल्ड नि कापून घ्या
  10. साजुक तुपात मंद आचेवर सोनेरी रंगावर तळून घ्या
  11. बस तयार लिटिलहार्ट सीताफळ अनारसे

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर