मुख्यपृष्ठ / पाककृती / पाकातल्या कलरफुल चंपाकळी

Photo of Pakatlya Colourful Champakali by Manisha Lande at BetterButter
625
2
0.0(0)
0

पाकातल्या कलरफुल चंपाकळी

Nov-11-2018
Manisha Lande
5 मिनिटे
तयारीची वेळ
20 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

पाकातल्या कलरफुल चंपाकळी कृती बद्दल

खुप टेस्टी आणि चविष्ट अशा चंपाकळी आहेत.

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • दिवाळी
  • महाराष्ट्र
  • फ्रायिंग
  • डेजर्ट

साहित्य सर्विंग: 4

  1. १ वाटी मैदा
  2. १ १/२ वाटी साखर
  3. १ वाटी पाणी
  4. चिमुटभर मीठ
  5. खायचा हिरवा रंग
  6. खायचा केशरी रंग
  7. तळण्यासाठी तेल
  8. १/४ छोटा चमचा वेलची पूड
  9. ४ ते ५ केशर काड्या

सूचना

  1. प्रथम मैदयात चिमूटभर मीठ व तेलाचे मोहन, व आवश्यकतेनुसार पाणी घालुन घट्ट पीठ मळुन घेतले व तासभर ओल्या कपडयात झाकून ठेवले.
  2. तयार पीठाचे तीन समान भाग करून घेतले.
  3. एका गोळ्याला खायचा हिरवा रंग लावून तो घट्ट मळुन घेतला.
  4. दुसरया गोळ्याला खायचा केशरी रंग लावून तो घट्ट मळुन घेतला.
  5. तिसरा गोळा असाच ठेवला.
  6. नंतर तीन गोळे घेवून त्याचा एक गोळा बनवून त्याला चंपाकळीचा आकार देऊन सर्व चंपाकळी बनविल्या.
  7. कढईत तेल गरम करत ठेवले.
  8. तेल गरम झाल्यावर त्यात चंपाकळी सोडून छान सोनेरी रंगावर खमंग तळून घेतलया.
  9. साखरेत पाणी घालुन तो ऊकळुन त्याचा एकतारी पाक करून त्यात वेलची पूड व केशर काड्या घातल्या.
  10. तयार चंपाकळी पाकात सोडुन १० मिनिटे मुरवत ठेवल्या.
  11. "पाकातल्या रंगीत चंपाकळी" तयार.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर