मुख्यपृष्ठ / पाककृती / पाकातले रंगीत चिरोटे

Photo of Pakatle Rangeet Chirote by Manisha Lande at BetterButter
607
2
0.0(0)
0

पाकातले रंगीत चिरोटे

Nov-11-2018
Manisha Lande
5 मिनिटे
तयारीची वेळ
30 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

पाकातले रंगीत चिरोटे कृती बद्दल

खुप टेस्टी आणि चविष्ट लागतो हा चिरोटा. आणि माझा ऑल टाईम फेवरेट दिवाळी फराळातील पदार्थ आहे.

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • दिवाळी
  • महाराष्ट्र
  • फ्रायिंग
  • डेजर्ट

साहित्य सर्विंग: 4

  1. १ वाटी मैदा
  2. १ १/२ वाटी साखर
  3. १ वाटी पाणी
  4. चिमुटभर मीठ
  5. तळण्यासाठी तेल
  6. १ मोठा चमचा कॉर्नफ्लॉवर
  7. ३ मोठे चमचे साजूक तूप
  8. खायचा हिरवा रंग
  9. खायचा केशरी रंग
  10. १/४ छोटा चमचा वेलची पूड
  11. ४ ते ५ केशर काड्या

सूचना

  1. प्रथम मैदयात चिमूटभर मीठ व तेलाचे कडकडीत मोहन घालुन घट्ट पीठ मळुन घेतले व तासभर ओल्या कपडयात झाकून ठेवले.
  2. कॉर्नफ्लॉवर व साजुक तुप एकजीव करून छान फेसुन फ्लफी होईपर्यंत त्याचा साटा तयार केला.
  3. साखरेत पाणी घालुन ऊकळुन त्याचा एकतारी पाक करून त्यात वेलची पूड व केशर काड्या घातल्या.
  4. तयार पीठाचे तीन समान भाग करून एका गोळ्याला खायचा केशरी रंग लावून तो घट्ट मळुन घेतला.
  5. दुसरया गोळ्याला खायचा हिरवा रंग लावून तो घट्ट मळुन घेतला.
  6. तिसरा गोळा असाच ठेवला.
  7. प्रथम पांढरा गोळा लाटुन त्याची जाडसर पोळी लाटून घेतली.
  8. नंतर हिरव्या गोळयाची पोळी लाटून बाजूला ठेवली
  9. केशरी रंगाची पोळी लाटून बाजूला ठेवली
  10. पांढरी पोळीला तयार साटा लावून त्यावर हिरव्या रंगाची पोळी ठेवून त्यावर साटा लावून त्यावर केशरी रंगाची पोळी ठेवून त्यावर साटा लावून घेतला.
  11. नंतर त्याचा घट्ट रोल करुन सुरीने कापुन मध्यम आकाराचे गोळे करून घेतले.
  12. नंतर साटयाची बाजु वर राहिल अशाप्रकारे ते लाटुन चिरोटे तयार केले.
  13. कढईत तेल गरम करत ठेवले.
  14. तेल गरम झाल्यावर त्यात चिरोटे सोडून छान सोनेरी रंगावर खमंग तळून घेतले.
  15. तयार चिरोटे गरम पाकात १० मिनिटे मुरत ठेवले.
  16. चिरोटे सर्व्हींग डिशमध्ये काढून घेतले व सर्व्ह केले.
  17. "पाकातले रंगीत चिरोटे" खाण्यासाठी तयार.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर