Photo of Kadhi Gole by Deepa Gad at BetterButter
1353
5
0.0(0)
0

कढी गोळे

Nov-13-2018
Deepa Gad
240 मिनिटे
तयारीची वेळ
45 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

कढी गोळे कृती बद्दल

माझ्या आजोळी गाईचे दूध मुबलक मिळत असे त्यामुळे दुधाचे, दह्याचे पदार्थ बऱ्याचवेळा बनत असत त्यातलाच हा एक प्रकार

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • इतर
  • महाराष्ट्र

साहित्य सर्विंग: 4

  1. कढीसाठी :
  2. दही १ कप
  3. बेसन ३ च
  4. साखर १ छोटा च
  5. फोडणीसाठी :
  6. तूप २ छोटे च
  7. मोहरी १ छोटा च
  8. जिरे १/२ च
  9. आलं बारीक चिरलेले १/२ च
  10. मेथी १/२ च
  11. हिंग चिमूट
  12. हिरवी मिरची ३
  13. कढीपत्ता ७-८ पाने
  14. लसूण पाकळ्या ५-६
  15. गोळे बनविण्यासाठी :
  16. भिजवलेली चणाडाळ १ वाटी
  17. तिखट १ च
  18. मीठ
  19. हिरवी मिरची १ चिरलेली
  20. कोथिंबीर
  21. तळण्यासाठी तेल

सूचना

  1. कढीसाठी :
  2. दह्यात बेसन, पाणी घालून घुसळून घ्या
  3. गॅसवर गरम करा व बाजूला ठेवा
  4. फोडणीकरिता तुपात मेथी, मोहरी, जिरे, आलं, लसूण ठेचून, मिरची चिरलेली, कढीपत्ता, हळद घालून फोडणी वरील ताकावर ओता
  5. गॅसवर गरम चांगली झाली की त्यात साखर टाका, गॅस बंद करून मग मीठ टाका नाहीतर ताक फाटते,
  6. ही झाली कढि तयार
  7. गोळे बनविण्यासाठी :
  8. भिजवलेली चणाडाळ मिक्सरमध्ये थोडंसच पाणी घालून वाटून घ्या त्यात मिरची, तिखट, मीठ घालून एकजीव करून हाताने फेटून घ्या म्हणजे गोळे हलके होतात
  9. तेलात छोटे छोटे गोळे तळून घ्या
  10. कढीत हे तळलेले गोळे खायच्या वेळेलाच घालून सर्व्ह करा
  11. तयार आहेत आपले कढी गोळे

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर