Photo of Dadpe pohe by Manasvi Pawar at BetterButter
295
1
0.0(0)
0

दडपे पोहे

Nov-15-2018
Manasvi Pawar
5 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

दडपे पोहे कृती बद्दल

माझ्या आजीची माझी आवडती रेसिपी

रेसपी टैग

  • Tossing (Mixing with a spoon / spatula)
  • व्हेज
  • सोपी
  • महाराष्ट्र
  • ब्रेकफास्ट आणि ब्रन्च
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. एक मोठा बाऊल जाडे पोहे
  2. एक मध्यम कांदा बारीक चिरून
  3. चार हिरव्या मिरच्या बारीक चिरून
  4. एक लहान लिंबू रस
  5. मीठ चवीनुसार
  6. साखर १/२ चमचा
  7. चार पाच कढीपत्त्याची पाने
  8. १/२ चमचा मोहरी
  9. १ चमचा तेल फोडणीसाठी
  10. कोथिंबीर भरपूर मला आवडते
  11. ओलं खोबरं दोन चमचे
  12. दोन चमचे शेंगदाणे

सूचना

  1. एका मोठ्या भांड्यात चिरलेला कांदा मीठ साखर आणि थोडा लिंबाचा रस घालून एकत्र करावे म्हणजे याला पाणी सुटते
  2. फोडणी साठी भांड्यात तेल गरम करावे
  3. दुसरीकडे पोहृयांना थोडा पाण्याचा हबका मारून घ्यावा
  4. आणि ते पोहे कांद्याच्या मिश्रणात एकत्र करावे सोबत थोडी चिरलेली कोथिंबीर आणि मिरची घालावी
  5. आता आपलं तेल गरम झाले आहे त्यामध्ये आपण मोहरी कढीपत्ता हिंग मिरची चे तुकडे आणि दोन चमचे शेंगदाणे घालून ती फोडणी पोह्यांवर घालूयात
  6. नंतर छान एकत्र करून घ्या
  7. आता एका प्लेटमध्ये सर्व करण्यासाठी पोहे घ्या
  8. त्यावर ओलं खोबरं आणि कोथिंबीर घालून खायला सूरवात करा
  9. तयार आहेत दडपे पोहे

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर