मुख्यपृष्ठ / पाककृती / तव्यातील गवार भाजी

Photo of Tavyatil Gawar Bhaji by Sanjay Patil at BetterButter
1275
2
0.0(0)
0

तव्यातील गवार भाजी

Nov-15-2018
Sanjay Patil
10 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
5 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

तव्यातील गवार भाजी कृती बद्दल

आपण नेहमी गवारीची भाजी करतो पण पुर्वी शेतातील ताजी देशी गवार मिळायची व आमची आजी सकाळी सकाळी ती ताजी ताजी तव्यावर करुन द्यायची न तेही कोणतेही पदार्थ न वापरतां व त्या भाजीची चवच वेगळी असायची तीच पद्धत वापरुन मी ही भाजी आपणासमोर सादर करतोय.

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • इतर
  • महाराष्ट्र
  • बेसिक रेसिपी
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 5

  1. १ वाटी गवार
  2. २ चिरलेले कांदे
  3. ६ ते ७ पाने कडीपत्ता
  4. ५ ते ६ लसुन पाकळी चेचुन
  5. २ चमचे जीरे व मोहरी
  6. १ चमचा हळद
  7. २ चमचे चटणी
  8. २ चमचे तेल
  9. १ छोटा तुकडा गुळ
  10. मीठ चवीनुसार, कोथिंबीर चवीनुसार

सूचना

  1. प्रथम तव्यात तेल घाला गरम झालेवर जीरे व मोहरी घाला, तडतडल्यावर कडीपत्ता घाला
  2. मग कांदे घालुन थोडा वेळ परतुन घ्या, त्यात मग लसुन घाला व परतल्यावर हळद, चटणी घाला व परतल्यावर गवार झाला, २ ते ३ मिनिटे चांगले परतुन घ्या
  3. त्यात गवार शिजण्यापुरते पाणी घाला मग गुळ,मिठ, कोथिंबीर घाला व पुन्हा गवार शिजेपर्यंत झाकण ठेवुन उकळी आणा.
  4. एकदा का गवार शिजली असे वाटल्यावर गॅस बंद करा. गरम गरम ज्वारीच्या भाकरी बरोबर सर्व्ह करा. खुप छान लागते.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर