मुख्यपृष्ठ / पाककृती / ठेच्याचा झुणका

Photo of Thechyacha Zunka by Sanjay Patil at BetterButter
387
2
0.0(0)
0

ठेच्याचा झुणका

Nov-15-2018
Sanjay Patil
10 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
7 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

ठेच्याचा झुणका कृती बद्दल

पुर्वीच्या काळी माणुस आजारपणातुन बरा झाल्यावर त्याच्या तोंडाला चव येण्यासाठी घरातील आई किंवा आज्जी हा झुणका करायची

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • महाराष्ट्र
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 7

  1. १ वाटी बेसन पिठ
  2. २ चिरलेले कांदे
  3. ५ ते ६ लसुन पाकळी चेचुन
  4. प्रत्येकी २ चमचे हळद, हिंग, जीरे, मोहरी
  5. ४ ते ५ मिरच्या ठेचुन
  6. तेल ३ चमचे
  7. चवीनुसार मिठ, कोथिंबीर

सूचना

  1. प्रथम एका कढईत अगर तव्यात तेल घाला. तेल तापल्यावर त्यात जीरे, मोहरी घाला व तडतडल्यावर त्यात कांदा घालुन परता व त्यात मग चेचलेला लसुन व मिरची घाला व परता व त्यात हळद व हिंग घाला व परत एकदा परतल्यावर २ वाटी पाणी घाला
  2. त्यात मग कोथिंबीर मिठ घाला व गॅस मोठा करा
  3. पाण्याला चांगली उकळी आल्यावर त्यात बेसण घालायला सुरवात करा. हे करत असताना पिठाची गुठळी होणार नाही याची काळजी घ्या.
  4. एकदा का पीठ घालुन झाले की ते चांगले मिक्स करुन घ्या व साधारण २ ते ३ मिनिटे हलवत रहा जेणेकरुन झुणका एकजीव होईल. थोडा घट्ट झाला की गरम गरम भाकरी किंवा चपाती बरोबर सर्व्ह करा. छान लागतो.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर