मुख्यपृष्ठ / पाककृती / मटकी खिचडी

Photo of Sprouted khichdi by Manasvi Pawar at BetterButter
282
1
0.0(0)
0

मटकी खिचडी

Nov-15-2018
Manasvi Pawar
10 मिनिटे
तयारीची वेळ
20 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

मटकी खिचडी कृती बद्दल

ही रेसिपी माझ्या आईची आहे.मी आता माहेरी आली आहे आहे आणि तिने आम्हा दोघी बहिणींची आवडती अशी मटकीची खिचडी केली आहे.my all time favorite

रेसपी टैग

  • व्हेज
  • मध्यम
  • टिफिन रेसिपीज
  • महाराष्ट्र
  • बेसिक रेसिपी
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

  1. एक वाटी तांदूळ
  2. १/२ वाटी मोड आलेली मटकी
  3. दोन मोठे चमचे तेल फोडणीसाठी
  4. मोहरी १ चमचा
  5. जिरे १ चमचा
  6. हिंग १/२ चमचा
  7. कढीपत्ता पाच सहा पाने
  8. हळद १/२ चमचा
  9. पाव चमचा लाल तिखट
  10. दालचिनी दोन लहान तुकडे
  11. २ मोठ्या वेलच्या
  12. ४ काळी मिरी
  13. २ लवंग
  14. २ तेजपत्ता
  15. आल लसूण पेस्ट दोन चमचे
  16. बडीशेप एक चमचा
  17. दोन वाट्या गरम पाणी
  18. मीठ चवीनुसार

सूचना

  1. तांदूळ आणि मटकी एकत्र धुऊन घेउन पाणी काढून टाकावे
  2. कुकर मध्ये फोडणी साठी तेल गरम करावे
  3. तेल गरम झाले की फोडणी साहित्य मोहरी जिरे कढीपत्ता हिंग तेजपत्ता घालावा
  4. नंतर कांदा परतून घ्यावा
  5. आता सगळा खडा मसाला थोडा ठेचून घ्या
  6. एक एक करून मसाले घाला
  7. आता आल लसूण पेस्ट घालून परतावे
  8. मीठ आणि गरम पाणी घालून कुकरचे झाकण लावून तीन शिट्या काढा
  9. कुकर थोडा थंड झाल्यावर झाकण उघडून पापड लोणच्या सोबत गरम खिचडी चार आस्वाद घ्या

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर