मुख्यपृष्ठ / पाककृती / टोमॅटोचं पिठलं

Photo of Tomato Zunka by Tejashree Ganesh at BetterButter
937
2
0.0(0)
0

टोमॅटोचं पिठलं

Nov-16-2018
Tejashree Ganesh
5 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

टोमॅटोचं पिठलं कृती बद्दल

कुठलीही भाजी घरात नसताना फक्त ४-५ साहित्यांपासून बनवली जाणारी माझ्या आजीची रेसिपी.

रेसपी टैग

  • सोपी

साहित्य सर्विंग: 2

  1. मोठे १ किंवा २ मध्यम आकाराचे टोमॅटो
  2. १ कांदा
  3. ३-४ लसून पाकळ्या
  4. बेसन मिश्रणात मावेल तेवढे
  5. हिरवी मिरची किंवा लाल तिखट
  6. मिठ चविप्रमाणे
  7. पाणी आवश्यकते नुसार
  8. कोथिंबीर (optional)
  9. फोडणीकरिता तेल
  10. मोहरी optional

सूचना

  1. प्रथम कांदा, टोमॅटो व लसून बारिक चिरून घेतले.
  2. नंतर कढईमधे गरजेपुरते तेल घेऊन ते गरम झाले की त्यात मोहरी टाकून तडतडू दिली. (आजी मोहरी वापरत नसे)
  3. कांदा गुलाबी रंगावर परतून घेतला
  4. नंतर लसून टाकून व्यवस्थित एकजीव करून घेतले. आणि टोमॅटो टाकून परतले.
  5. चविपुरते मिठ व तिखट टाकले, हिरवी मिरची देखील टाकू शकतो.
  6. व मिश्रण चांगले एकजीव करून घेऊन त्यात मावेल तसे बेसन पिठ टाकले.
  7. थोडे पाणी घालून १ वाफ काढली.
  8. कोथिंबीर टाकून garnish केले.
  9. गरम गरम भाकरी किंवा पोळी सोबत छान लागते.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर