मुख्यपृष्ठ / पाककृती / चुलीवरचा डाळ कांदा

Photo of Chulivarcha Dal Kanda by Sanjay Patil at BetterButter
833
1
0.0(0)
0

चुलीवरचा डाळ कांदा

Nov-16-2018
Sanjay Patil
15 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
5 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

चुलीवरचा डाळ कांदा कृती बद्दल

आपल्याकडे ग्रामिण भागांत चुलींवर स्वयंपाक केला जायचा, पण आता चुलींची जागा गॅसने घेतली व खास अशा स्वादाला आपण मुकलो. पण परसदारी आपण छोटीशी चुल बनवुन आपण तो स्वाद घेवु शकतो.

रेसपी टैग

  • व्हेज
  • इतर
  • महाराष्ट्र
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 5

  1. १ वाटी तुरीची डाळ
  2. २ कांदे बारीक चिरुन
  3. ३ ते ४ लसुन पाकळ्या
  4. आल्ले १ तुकडा
  5. २ चमचे जीरे, मोहरी
  6. १ चमचा हळद
  7. २ चमचे बेसण पिठ
  8. ३ चमचे कांदा लसुन चटणी
  9. ३ चमचे तेल
  10. मिठ, कोथिंबीर चवीनुसार

सूचना

  1. प्रथम तुरीची डाळ १० मिनिटे भिजवून ठेवा
  2. त्यानंतर चुलींवर तवा किंवा कढईमध्ये तेल घ्या व गरम झाल्यावर त्यात जीरे मोहरी टाका व तडतडल्यावर कांदा टाका व थोडा परता,
  3. त्यात मग लसुन आल्ले टाका व थोडंसं परतुन घ्या. त्यात आता हळद व चटणी टाका व परतत असताना बेसन पिठ घाला( बेसन पिठीमुळे घट्टपण व वेगळा स्वाद येतो) व मग भिजवलेली तुरीची डाळ घाला
  4. थोडीशी परतल्यावर त्यात आपल्याला हवे तेवढे पाणी घाला, चवीनुसार मिठ, कोथिंबीर घाला व चांगली उकळी आणा. तयार झाला आपला चुलीवरचा डाळकांदा.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर