BetterButter अॅप

पाककृती, खाद्य समुदाय आणि स्वयंपाकघर

(8,719)
डाउनलोड करा

कृपया आपली रेसपी अपलोड करा अ‍ॅप डाउनलोड करा

मुख्यपृष्ठ / पाककृती / लहसुनी मूग डाळ पालक

Photo of Lasuni moong dal palak by Rohini Rathi at BetterButter
0
4
0(0)
0

लहसुनी मूग डाळ पालक

Nov-19-2018
Rohini Rathi
10 मिनिटे
तयारीची वेळ
15 मिनिटे
कूक वेळ
3 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

लहसुनी मूग डाळ पालक कृती बद्दल

ही पाककृती माझ्या आजीची स्पेशल आहे पालकाची भाजी जास्त करून आवडत नसल्यामुळे त्यात मूग डाळ व लसुन चा वापर करून बनवलेली ही लसुन मूग डाळ खाण्यास खूप स्वादिष्ट लागते

रेसपी टैग

 • Tossing (Mixing with a spoon / spatula)
 • व्हेज
 • सोपी
 • डिनर पार्टी
 • महाराष्ट्र
 • प्रेशर कूक
 • बॉइलिंग
 • मेन डिश
 • हेल्दी

साहित्य सर्विंग: 3

 1. साले असलेली मूग डाळ अर्धा कप
 2. बारीक चिरलेली पालक अडीचशे ग्राम
 3. तेल दोन टेबल स्पून
 4. लसुन बारीक चिरलेला एक टेबल स्पून
 5. हिरवी मिरची व आल्याची पेस्ट एक टेबल स्कूल
 6. जिरे अर्धा टी स्पून
 7. मोहरी अर्धा टी स्पून
 8. हिंग चिमटीभर
 9. सुकलेली लाल मिरची 2
 10. लाल मिरची पावडर 1 टेबल स्पून
 11. गरम मसाला अर्धा टी
 12. हळद पाव टी स्पून
 13. मीठ चवीनुसार
 14. बारीक चिरलेला टोमॅटो एक
 15. फोडणीसाठी
 16. सुकी लाल मिरची 2
 17. जिरे मोहरी हिंग फोडणीसाठी
 18. लसणाच्या पाकळ्या तीन ते चार

सूचना

 1. सर्वप्रथम मुगाची डाळ स्वच्छ धुऊन कुकरमध्ये एक शिट्टी घेऊन शिजवून घ्यावे
 2. पालकाची भाजी स्वच्छ धुवून बारीक कापून घ्यावी
 3. कढईमध्ये तेल गरम करून लसणाची पेस्ट हिरवी मिरची पेस्ट मंद आचेवर परतून घ्यावे
 4. नंतर सुक्या लाल मिरच्या जिरे मोहरी हिंग घालून घ्यावे
 5. नंतर बारीक चिरलेली पालक घालून परतून घ्यावी
 6. चवीनुसार मीठ घालावे
 7. बारीक चिरलेला टोमॅटो घालावा
 8. पालकाची भाजी शिजल्यानंतर त्यात शिजवलेले मूग डाळ व आवश्यकतेनुसार पाणी घालून मंद आचेवर मिश्रणाला उकळी येईपर्यंत शिजवावे
 9. नंतर कढईत एक चमचा तेल गरम करून जिरे मोहरी व हिंग सुकी मिरची लसणाच्या दोन पाकळ्या ची फोडणी बनवून घ्यावी
 10. भाजी बाऊल मध्ये काढून तयार फोडणी वरती घालावी
 11. पोळी व भाताबरोबर गरमागरम लसूण मुगडाळ पालक सर्व करावी

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर