Photo of Masala Rice by Tejashree Ganesh at BetterButter
559
2
0.0(0)
0

मसाले भात

Nov-19-2018
Tejashree Ganesh
20 मिनिटे
तयारीची वेळ
20 मिनिटे
कूक वेळ
3 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

मसाले भात कृती बद्दल

गावाकडे लग्न समारंभात केला जाणारा एक हमखास पदार्थ मसाले भात..आणि ही माझ्या आजीची रेसिपी.

रेसपी टैग

  • व्हेज
  • मध्यम
  • डिनर पार्टी
  • महाराष्ट्र
  • मेन डिश

साहित्य सर्विंग: 3

  1. बासमती तांदूळ १ कप धुवून १५ मि. भिजविलेला.
  2. पाणी २ कप
  3. तेल किंवा तुप २ चमचे
  4. भाज्यांचे काप पाऊन कप ( वांगी, वाटाणा, फ्लॉवर, बटाटा ई.)
  5. आलं-लसून पेस्ट १ चमचा
  6. कांदे २
  7. टोमॅटो २
  8. गरम मसाला १ चमचा
  9. गोडा मसाला १/२ चमचा
  10. १-२ तमालपत्र
  11. १ इंच दालचिनी तुकडा
  12. ३-४ वेलची
  13. ३-४ लवंगा
  14. ४-५ मिरं
  15. जिरं १ चमचा
  16. हळद
  17. हिंग
  18. मिठ
  19. पुदिन्याची पाने
  20. कोथिंबीर

सूचना

  1. तांदूळ धुवून १५-२० मि. भिजवून निथळत ठेवणे.
  2. सर्व भाज्या कापून घेतल्या.
  3. एक जाड बुडाच्या पातेल्यात तेल टाकून त्यात जीरं, तमालपत्र, लवंगा, मिरे, दालचिनी असा सर्व खडा मसाला टाकून घेतला.
  4. त्यामधे चिरलेला कांदा टाकला तो गुलाबी रंगावर परतून घेतला.
  5. नंतर त्यामधे आलं-लसून पेस्ट टाकून चांगले परतून घेतले.
  6. ह्यात हळद, हिंग, व ईतर मसाले घालून परतून घेतले.
  7. आता सर्व भाज्या व टोमॅटो टाकून तसेच मिठ टाकून २-३ मि. परतून घेतले,
  8. आता तांदूळ घलून एकजीव करून घेतले.
  9. २ कप पाणी गरम करून वरिल मिश्रणात घातले. व हा मसाला भात शिजू दिला.
  10. वरून कोथिंबीर व पुदिन्याने ने garnish केले.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर