Photo of Puranpoli by Tejashree Ganesh at BetterButter
1217
1
0.0(0)
0

पुरणपोळी

Nov-20-2018
Tejashree Ganesh
30 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
3 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

पुरणपोळी कृती बद्दल

पुरणपोळी तशी महाराष्ट्रीय पदार्थांची राणीच... आणि सनासुदीला बरेचजण ही पुरण पोळी बनवतात. माझी आजी ही पुरणाची पोळी जशी बनवते अगदी तशीत माझा आई देखील, आणि आता मीही..

रेसपी टैग

  • व्हेज
  • मध्यम
  • दिवाळी
  • महाराष्ट्र

साहित्य सर्विंग: 3

  1. हरभरा दाळ १ कप
  2. गुळ १ ते १-१/४ कप (सव्वा)
  3. पाणी ४-६ कप
  4. वेलची पुड १ लहान चमचा
  5. जायफळ पुड १/२ लहान चमचा
  6. गव्हाचे पिठ १ कप
  7. तेल १ चमचा
  8. मैदा १/२ कप
  9. चविपुरते मिठ
  10. कणके करिता पाणी
  11. गावराण तूप वरून लावण्याकरिता

सूचना

  1. प्रथम दाळ स्वच्छ धुवून घेतली.
  2. जाड बुडाच्या पातेल्यात ७-८ वाट्या पाणी घालून दाळ शिजवून घेतली. (मी कुकरमधे करते ३-४ शिट्ट्यांमधे दाळ शिजते.)
  3. एका भांड्यात गव्हाचे पिठ, मैदा व मिठ टाकून कणिक मळून घेतली. फार घट्ट वा फार पातळ मळू नये.
  4. ही कणिक झाकून बाजूला ठेवली.
  5. ह्यानंतर शिजलेली दाळ एका जाड बुडाच्या भांड्यात व त्यातील पाणी एका भांड्यात काढून घेतले. (हे पाणी फेकून देऊ नये)
  6. दाळ असलेले भांडे गॅसवर moderate flame वर ठेवले. त्यात गुळ घालून मिश्रण व्यवस्थित एकजीव करून घेतले.
  7. थोड्याच वेळात दाळ पातळ होऊन गुळ वितळू लागतो. हे मिश्रण अधून मधून हलवत राहावे.
  8. काही वेळनंतर दाळ घट्ट होऊ लागली की त्यात वेलची पुड व जायफळ पुड टाकून पुन्हा मिश्रण व्यवस्थित एकत्रित करून घेतले.
  9. हे मिश्रण थंड होण्याकरिता बाजूला काढून ठेवले. ह्याला पुरण म्हणतात.
  10. पुरण थंड झाले की, बाजूला ठेवलेली कणिक पुन्हा चांगली मळून घेतली.
  11. गॅसवर तवा तापत ठेवला, कणकेचा एक गोळा घेऊन त्याची पिठाच्या सहाय्याने पारी करून घेतली. ह्या पारीमधे पुरणाचा गोळा भरून ही पारी सर्व बाजूंनी व्यवस्थित बंद करून घेतली.
  12. हा गोळा हलक्या हातने लाटून घेतला व त्याची पोळी बनवली.
  13. पोळी दोन्ही बाजूंनी भाजून घेऊन त्यावर गावराण तुप टाकले.
  14. तयार पोळी किचन टॉवल वर काढून घेतली.
  15. अशाप्ररकारे सर्व पोळ्या करून घेतल्या. ह्या पोळ्या दुध-गावराण तुप, फक्त तुप ,गुळवळी तसेच कटाच्या आमटी सोबतही serve केली जाते.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर