मुख्यपृष्ठ / पाककृती / फुललोडेड व्हेजिज मसाला रेडराईस

Photo of Fullloaded Veggies Masala Redrice by Vaishali Joshi at BetterButter
705
2
0.0(0)
0

फुललोडेड व्हेजिज मसाला रेडराईस

Nov-20-2018
Vaishali Joshi
15 मिनिटे
तयारीची वेळ
45 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

फुललोडेड व्हेजिज मसाला रेडराईस कृती बद्दल

रेड राईस हया तांदळाला हातसडीचा तांदूळ / देवसळी चे तांदुळ / रुषी तांदुळ पण म्हणतात . रुषीपंचमी ला ह्याचे खास महत्त्व असते . लहानपणा पासूनच रुषीपंचमिला हा भात केलाच जायचा पण अगदी साधा आणि तो घरच्या दह्या सोबत खात असू ... चव म्हणाल तर आहाहा ...पण ही आजीची रेसिपीला मी वेगवेगळळ्य़ा भरपूर भाज्या आणि काही मसाल्यान चा वापर करून केलि आहे

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • एव्हरी डे
  • महाराष्ट्र
  • प्रेशर कूक
  • मेन डिश
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

  1. लाल तांदुळ / रेड राईस / देवसळी चे तांदुळ /हातसडीचा तांदुळ / रुषीतांदुळ २ कप
  2. फूलकोबी ( फ्लावर )
  3. बटाटा १
  4. टोमेटो १
  5. गाजर १/२
  6. मुळा१/२
  7. मटार चे दाणे १/४ कप
  8. पोपटी चे दाणे १/४ कप
  9. पापड़ी वाल ४-५
  10. वांग १
  11. लाल भोपळा च्या फोड़ी
  12. हिरव्या मिरच्या २
  13. कोथिंबीर
  14. लिंबू १
  15. कांदा १ छोटा
  16. आल लसुण पेस्ट ११/२ चमचा
  17. तेल ३-४ चमचे
  18. राई १/२ चमचा
  19. हिंग १/२ चमचा
  20. तिखट आवडीनुसार
  21. हळद १/२ चमचा
  22. मीठ चवीनुसार
  23. गोडा मसाला १ चमचा
  24. छोटी वेलची २-३
  25. मोठी वेलची २
  26. स्टार फुल १
  27. तेज पान १-२
  28. काजू ८-१०
  29. दालचीनी तूकडे २

सूचना

  1. तांदुळ खुपदा निवडून घ्या (कारण खुप काळे खड़े असतात यात )
  2. तांदुळ २-३ तास पाण्यात भिजत ठेवा
  3. सगळ्या भाज्या चिरुन घ्या
  4. गैस वर कुकर मधे ३-४ चमचे तेल घाला ते तापले की अनुक्रमे त्यात राई , हिंग , तेजपान , मोठी आणि छोटी वेलची , दालचीनी , स्टारफुल , काजू घालून परतून घ्या
  5. नंतर त्यात आल लसुण पेस्ट घालून परता व मग सगळ्या भाज्या घालून परतून घ्या आणि नंतर त्यात पाण्यातून तांदुळ काढून घेवुन टाका आणि थोडा वेळ परतून घ्या
  6. तिखट , हळ्द , गोडा मसाला , थोड़ी कोथिंबीर घालून छान परतून घ्या
  7. तांदळाच्या डबल किंवा अंदाजे लागेल तेवढे उकळते पाणी घाला व चवीनुसार मीठ घालून कुकरचे झाकण लावून ३ शिट्ट्या होऊ द्या
  8. कुकर थंड झाल्यावर भात शिजला की नाही चेक करा . सर्व्हिंग प्लेट मध्ये काढून वरून लिंबू पिळा , कोथिंबीर भूरभूरवा तळलेल्या काजुने गार्निश करा आणि गरमा गरम सर्व्ह करा

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर