BetterButter अॅप

पाककृती, खाद्य समुदाय आणि स्वयंपाकघर

(8,719)
डाउनलोड करा

कृपया आपली रेसपी अपलोड करा अ‍ॅप डाउनलोड करा

मुख्यपृष्ठ / पाककृती / Fillup Brinjal

Photo of Fillup Brinjal by Suchita Wadekar at BetterButter
317
4
0(0)
0

Fillup Brinjal

Nov-20-2018
Suchita Wadekar
10 मिनिटे
तयारीची वेळ
15 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

रेसपी टैग

 • व्हेज
 • सोपी
 • एव्हरी डे
 • महाराष्ट्र
 • मेन डिश
 • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

 1. पाव किलो वांगी
 2. हिंग अर्धा टी स्पून
 3. हळद 1 टी स्पून
 4. लसूण 4-5 पाकळ्या
 5. खोबरे अर्धी वाटी
 6. कोथिंबीर
 7. कांदा लसूण मसाला 2 चमचे
 8. शेंगदाण्याचा कूट अर्धी वाटी
 9. मीठ आवश्यकतेनुसार

सूचना

 1. वांगयाचा देठ अर्धा कापून त्याच्या विरुद्ध बाजूने वांग्याला दोन उभी आडवी चिर द्यावी.
 2. चिरलेली हि वांगी एका पातेल्यात पाण्यात घालून ठेवावीत.
 3. लसूण, खोबरे, कोथिंबीर पाट्यावर (मिक्सरवर) बारीक करून घ्यावे.
 4. गॅसवर एका कढईत तेल तापत ठेवावे, त्यात हिंग, हळद व लसूण, खोबरे, कोथिंबिरीचे वाटण घालावे.
 5. यानंतर यात कांदा लसूण मसाला व दाण्याचा कूट घालावा व चांगले तेल सुटेपर्यंत परतावे.
 6. यानंतर यातील थोडा मसाला वांग्यात भरावा आणि ती वांगी कढईत सोडावीत व परतावी.
 7. यानंतर यात वांगी शिजण्यापूरते पाणी घालावे, मीठ घालावे.
 8. उकळी आली की गॅस बारीक करावा आणि झाकण ठेवून वांगी शिजू द्यावीत.
 9. 15 मिनिटांनी वांगी शिजली का ते चेक करून गॅस बंद करावा.
 10. आपले भरलं वांगं तैयार !

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर