Photo of Khichadi by Ujwala Surwade at BetterButter
624
3
0.0(0)
0

Khichadi

Nov-21-2018
Ujwala Surwade
20 मिनिटे
तयारीची वेळ
15 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

रेसपी टैग

  • Tossing (Mixing with a spoon / spatula)
  • व्हेज
  • सोपी
  • इतर
  • महाराष्ट्र
  • प्रेशर कूक
  • सौटेइंग
  • बेसिक रेसिपी
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

  1. एक वाटी तांदूळ
  2. अर्धी वाटी तूरडाळ
  3. कांदे २
  4. टोमॅटो अर्धा
  5. कढीपत्ता
  6. तेजपान
  7. आल -लसूण पेस्ट
  8. ४लवंगा
  9. ४काळी मिरी
  10. जिरं एक टीस्पून
  11. मोहरी अर्धा टीस्पून
  12. मोठी वेलची एक
  13. दालचिनी एक तुकडा
  14. चक्रीफूल एक
  15. शहाजिरे एक टीस्पून
  16. शेंगदाणे दीड मुठ
  17. एक बटाटा
  18. हळद
  19. हींग
  20. तिखट एक चमचा
  21. गरम मसाला अर्धा चमचा
  22. कोथिंबीर
  23. मीठ
  24. तेल
  25. पाणी

सूचना

  1. पूर्व तयारी मध्ये सर्व जिन्नस काढून ठेवावे.
  2. नंतर कांदा टोमॅटो कोथिंबीर कापून घ्या
  3. नंतर कुकरमध्ये तेल घालून खडा मसाला (मिरे ,लवंगा ,तेजपान वगैरे )टाकून शेंगदाणे, कढीपत्ता ,कांदा टोमॅटो घालून परतावे. नंतर मीठ घालून आलं-लसूण पेस्ट टाकून कांदा गुलाबी रंगावर आला की हींग ,हळद लाल तिखट गरम मसाला घालून परतावे
  4. नंतर बटाटा घालून परतावे छान तेल सुटेपर्यंत परतत रहावे
  5. दाळ तांदूळ धुवून घ्या . छान तेल सुटले की थोडे पाणी घालून मसाला छान शिजू द्यावा
  6. नंतर डाळ तांदूळ टाकून आवश्यक तेवढे पाणी घालून कुकरचे झाकण बंद करा
  7. मोठ्या गँसवर २शिट्ट्या काढून ३री शिट्टी होण्याआधीच गँस बंद करा.
  8. आणि ती वाफ तशीच राहू द्या. कुकर गार झाल्यावर गरमागरम खिचडी तयार
  9. वरतून छान तेल घ्यावे
  10. लोणचे पापड सोबत मस्त आस्वाद घ्यावा

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर