मुख्यपृष्ठ / पाककृती / सुरणाची पूरणपोळी

Photo of Surnachi Puranpoli by Vaishali Joshi at BetterButter
633
5
0.0(0)
0

सुरणाची पूरणपोळी

Nov-21-2018
Vaishali Joshi
10 मिनिटे
तयारीची वेळ
50 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

सुरणाची पूरणपोळी कृती बद्दल

आजी च्या पाककृतिं मधील ही एक नाविण्य़पूर्ण रेसिपी . सूरणा चे पूरण करून ते भरून केलेली पोळी .

रेसपी टैग

  • व्हेज
  • मध्यम
  • इतर
  • महाराष्ट्र
  • रोस्टिंग
  • डेजर्ट
  • एग फ्री

साहित्य सर्विंग: 4

  1. सुरण १/२ किलो
  2. साखर ११/२ कप
  3. जायफळ वेलची पावडर १/२ चमचा
  4. १ लींबा चा रस
  5. साजुक तूप
  6. मीठ
  7. कणिक १/२ कप
  8. मैदा ३/४ कप

सूचना

  1. सुरणा चे मोठे मोठे तुकडे सुरीने कापून घ्या आणि त्याचे साल पण सुरीने काढून घ्या व फोड़ी धुवून घ्या
  2. नंतर सगळे तुकडे एका भांड्यात घालून त्यावर लिंबाचा रस व थोड मीठ लावून घ्या आणि थोड पाणी घालून कुकर मधे ठेवून ३-४ शिट्ट्या काढून सुरण नरम शिजवून घ्या
  3. थंड झाल्यावर फोडी पुन्हा एकदा पाण्या ने धुवून घ्या म्हणजे त्याचा आंबट पणा निघून जाइल ,व मग त्याला पूरण यंत्रातुन बारीक़ करून घ्या , यंत्र नसेल तर हातानेच कुस्करून घ्या व गैस वर कढईत घाला
  4. आता यात साखर घालून मिश्रण गोळा होइस्तोवर परता
  5. मिश्रण घट्ट झाले की त्यात जायफळ + वेलची पावडर घालून एकजीव करून घ्या गैस बंद करा आणि पूरण गार होऊ द्या
  6. कणिक व मैदा एकत्र करून थोड तेला चे मोहन घाला आणि पाण्याने पीठ भिजवून घ्या , पुरणा चे गोळे करून ठेवा
  7. मळलेल्या पीठाचा गोळा करून हाताने त्याची पारी करून आतून थोडा तेलाचा हात फिरवून त्यात पुरणा चा गोळा भरून बंद करा व पोळी लाटून घ्या
  8. गरम तव्यावर तयार पोळी घालून दोन्ही बाजूने साजुक तूप सोडून खरपूस भाजून घ्या , अशा प्रकारे सर्व सुरणा चे पूरण भरून पोळ्य़ा करून घ्या
  9. गरम गरम पोळी सोबत साजुक तूपाची वाटी ... सर्व्ह करा

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर