Photo of Mutton Curry by Shraddha Juwatkar at BetterButter
710
1
0.0(0)
0

मटण रस्सा

Nov-21-2018
Shraddha Juwatkar
0 मिनिटे
तयारीची वेळ
40 मिनिटे
कूक वेळ
5 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

मटण रस्सा कृती बद्दल

गावात घरोघरी कोंबडी पाळत असल्याने रविवारी चिकन खाल्ले जात असे पण मुंबईला परतताना आजीच्या हातचे चुलीवरचे मटण हमखास बनवले जायचे

रेसपी टैग

  • नॉन व्हेज
  • मध्यम
  • डिनर पार्टी
  • गोवा

साहित्य सर्विंग: 5

  1. 1/2 किलो मटण
  2. 2 मोठे कांदे उभे चिरून व 1 मोठा कांदा बारीक चिरलेला
  3. 1 टोमॅटो
  4. हिरवी चटणी: 10/12 लसूण पाकळ्या+ 1 इंच आले + 5/6 हिरव्या मिरच्या व मूठभर कोथिंबीर (मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्यावी)
  5. 1/2 वाटी किसलेले सुके खोबरे
  6. 2 टेबलस्पून मालवणी मसाला
  7. 1 टेबलस्पून काश्मिरी मिरची पावडर
  8. 1 टेबलस्पून गरम मसाला पावडर
  9. हळद मीठ व तेल आवश्यकतेनुसार
  10. 2 तेजपत्ता व 1 मोठी ईलायची
  11. पाणी

सूचना

  1. मटण बारीक करून स्वछ धूवून घ्यावे
  2. मटणाला अर्धी हिरवी चटणी पेस्ट, हळद व काश्मिरी मिरची पावडर चोळून 1 तास झाकून ठेवावे.
  3. उभे चिरलेले कांदे तेलात लालसर भाजून घ्यावे व खोबरेही खमंग भाजून घ्यावे व मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्यावे.
  4. कुकर मध्ये थोडे जास्तीचे तेल गरम करून त्यात तेजपत्ता व मोठी ईलायची घालून फोडणी द्यावी नंतर त्यात बारीक चिरलेला कांदा लालसर होईपर्यंत चांगला परतून टोमॅटो पण परतून घ्यावे. राहिलेली हिरवी चटणी त्यात घालून व्यवस्थित ढवळून घ्यावे व मालवणी मसाला घालून मटण तेल सुटेपर्यंत पंधरा मिनिटे परतून घेणे.
  5. एका पातेल्यात 2 ग्लास पाणी गरम करत ठेवावे.
  6. मटण परतून झाल्यावर त्यात गरम पाणी घालून मीठ घालावे व झाकण ठेवून 4/5 शिट्या करून घ्याव्या व गॅस बंद करावा .
  7. कुकर थंड झाल्यावर त्यात खोबरयाचे वाटण व गरम मसाला पावडर घालून एक ऊकळी काढावी व कोथिंबीर घालून गॅस बंद करावा .

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर