Photo of Avlyache Lonche by Deepa Gad at BetterButter
1330
3
0.0(1)
0

Avlyache Lonche

Nov-23-2018
Deepa Gad
0 मिनिटे
तयारीची वेळ
60 मिनिटे
कूक वेळ
10 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • महाराष्ट्र
  • लोणचं / चटणी वगैरे

साहित्य सर्विंग: 10

  1. आवळे अर्धा किलो
  2. बेडेकर लोणच्याचा मसाला
  3. मोहरी ५० ग्राम
  4. तेल दीड वाटी
  5. मेथीची पावडर पाव च
  6. मीठ चवीनुसार
  7. व्हिनेगर २ च

सूचना

  1. मोहरी तव्यावर थोडी गरम करून मिक्सरमध्ये जाडसर पूड करा (मिक्सर चालू बंद दोनदाच करावा)
  2. ताटात घेऊन त्याची सालं काढून टाका. ताज्या मोहरीची पावडर केली तर खूप छान स्वाद येतो, मोहरीची डाळ वापरली तरी चालेल
  3. आवळ्याचे बी काढून हवे तसे तुकडे करून घ्या
  4. भांड्यात तेल मंद गॅसवर धूर येईपर्यंत गरम करा नंतर गॅस बंद करा
  5. तेल थोडंसं कोमट झालं की मेथीपूड, मोहरीची पूड, घाला
  6. थोड्यावेळाने त्यात लोणच्याचा मसाला ५० ग्राम टाका
  7. मीठ व आवळ्याचे तुकडे टाकून चांगले ढवळा
  8. बरणी स्वच्छ धुवून कोरडी केल्यावरच त्यात तळाला व्हिनेगर १ च घाला मग त्यावर लोणचे भरा करतो तेल दिसलं पाहिजे, तेल कमी वाटल्यास गरम करून पूर्णपणे थंड झाल्यावर वरून ओता म्हणजे लोणचे वर्षभर टिकते.

रिव्यूज (1)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
supriya padave (krupa rane)
Nov-23-2018
supriya padave (krupa rane)   Nov-23-2018

Mast yummy....:smiley:

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर