Photo of Dal Gandori by Triveni Patil at BetterButter
2278
4
5.0(0)
0

Dal Gandori

Nov-23-2018
Triveni Patil
20 मिनिटे
तयारीची वेळ
30 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

रेसपी टैग

  • व्हेज
  • मध्यम
  • इतर
  • महाराष्ट्र
  • प्रेशर कूक
  • मेन डिश
  • हाय फायबर

साहित्य सर्विंग: 4

  1. १. १ वाटी तूरडाळ.
  2. २.१ मोठी जुडी आंबटचुका.
  3. ३. २. हि. टमाटर.
  4. ४. पाऊन जुडी पालक.
  5. ५.७/८ हिरव्या मिरच्या.
  6. ६.५-६ मोठ्या पाकळ्या लसूण.  
  7. ७.१ इंच आल्याचा तुकडा.
  8. ८.१/२ ते १ वाटी शेंगदाणे.
  9. ९.१/२ वाटी खोबर्‍याचे काप.
  10. फोडणी साठी साहित्य :-
  11. १.३-४ लांब हिरव्या मिरच्या
  12. २.चवीप्रमाणे मीठ
  13. ३.५-६ लसूण पाकळ्या
  14. ४. १. टे.स्पुन जिरे.
  15. ५. ७-८ कढीपत्त्याची पाने.
  16. ६.साधारण ४-५ टेबल्स्पून तेल.
  17. ७. अर्धा टिस्पुन हळद.
  18. ८. १. टे.स्पुन गरम मसाला.

सूचना

  1. १.वरिल साहित्यामधील पालेभाज्या निवडून घ्यायच्या. लसूण, आले ओबडधोबड ठेचुन घ्यायचे. मिरच्यांचे तुकडे करून घ्यायचे. भाज्या धुवुन घ्यायच्या. टोमॅटोचे मोठे तुकडे करायचे.
  2. २.कुकर गँस वर ठेवावा, दुसरी कडे तूरडाळ धुवुन घ्यायची. कुकर मध्ये त्यात १ डाव तेल घालून तेल गरम झाले की लसूण, आले, मिरच्या, खोबऱ्याचे काप शेंगदाने, चिरलेल्या भाज्या, व दाळ असे सगळे एकत्र करुन पुरेसे पाणी घालायचे.
  3. ३.आणि ४/५ शिट्टया घेवुन सगळे नीट शिजवून घ्यायचे.
  4. ४. कुकर थंड झाला की हे सगळे शिजलेले साहित्य बारीक करुन घ्यायचे. हँडब्लेंडर / किंवा रवी कशानेही बारीक करू शकता.
  5. ५. हे सगळे खूप घट्ट झाले असेल तर थोडे पाणी घालायचे. साधारण आळूच्या भाजीसारखी कंसिस्टन्सी असली पाहीजे.
  6. ६. फोडणी मधिल साहित्य मिरच्यांचे तुकडे करुन घ्यायचे.आले-लसूण चे तुकडे करून घ्यायचे.
  7. ७. एका मोठ्या कढईत तेल तापवायचे, त्यात जिरं कढिपत्त्याची पाने घालुन परतून घ्यायचे. मिरच्यांचे तुकडे आणि आले-लसणाचे तुकडे टाकून परतून घ्यायचे. मग किंचीत हळद आणि गरम मसाला घालावा.
  8. ८.आता शिजवून बारीक केलेली भाजी यावर घालायची.
  9. ९. मीठ घालून भाजी बारीक आचेवर उकळायची. कोथिंबीर घालून सर्व्ह करा.
  10. १० ही अशी गरम गरम डाळ गंडोरी ( दाय गंडोरी ) वाफाळत्या भाताबरोबर मस्त लागते. भाकरी, चपाती कशबरोबरही खाऊ शकतात.
  11. यात एकुण १२-१४ मिरच्या आहेत तरी डाळ, भाज्या यांच्या प्रमाणामुळे ही भाजी अती तिखट होत नाही. 

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर