मुख्यपृष्ठ / पाककृती / मसाला ढेमसे

Photo of masala dhemse by Chayya Bari at BetterButter
1402
4
0.0(0)
0

मसाला ढेमसे

Nov-23-2018
Chayya Bari
15 मिनिटे
तयारीची वेळ
20 मिनिटे
कूक वेळ
3 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

मसाला ढेमसे कृती बद्दल

ही एक विदर्भ स्पेशल भाजी. आजीच्या हातची तर अप्रतिम. उन्हाळ्यात मिळणारी ही भाजी आजी आम्ही सुट्टीत गावी गेल्यावर हमखास करायची मी ही शिकले तिच्याकडून.

रेसपी टैग

  • व्हेज
  • कठीण
  • एव्हरी डे
  • महाराष्ट्र
  • प्रेशर कूक
  • बॉइलिंग
  • सौटेइंग
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 3

  1. मध्यम आकाराची पण कोवळी ढेमसे पावशेर
  2. कांदा बारीक कापून 1 वाटी
  3. खोबरे किस 1/2वाटी
  4. धने 2चमचे
  5. खसखस 1चमचा भाजून
  6. तीळ 1चमचा भाजून
  7. आले लसूण पेस्ट 1चमचा
  8. तिखट 2चमचे
  9. काळा मसाला 1चमचा किंवा गरम मसाला
  10. जिरे,मोहरी,हिंग, फोडणीसाठी
  11. कोथिंबीर
  12. मेथी पावडर चिमुटभर
  13. तेल 4चमचे
  14. मीठ चवीनुसार
  15. हळद 1/2चमचा

सूचना

  1. प्रथम कांदा खोबरे धने लालसर भाजून घ्या
  2. त्यात भाजलेले,तीळ,खसखस व कोथिंबीर घालून वाटण करा
  3. आता ढेमसाच्या वरचे तोंड सुरीच्या वरच्या टोकाने अलगद काढून बाजूला ठेवा
  4. टोकदार वस्तू उदा. दाभन घेवून आतील बी काढून घ्या
  5. आता ढेमसे धुवून घ्या
  6. तेल तापवून त्यात मोहरी जिरे हिंग मेथी पावडर घालून फोडणी करा
  7. गॅस बारीक करुन आले लसूण पेस्ट घाला तिखट,हळद,गरम मसाला,मीठ घाला
  8. लगेच चमचाभर पानी घालून हलवा मसाला जळू नये
  9. आता केलेले वाटण घालून छान तेल सुटेपर्यंत परता
  10. गॅस बंद करा व अर्धे वाटण काढून गार करून ते ढेमसात स्टफ्फ करा वर धेमसाचे काढलेले टोक ठेवा
  11. आता गॅसवर उरलेले परतलेले वाटण ठेवा स्टफ्ड ढेमसे अलगद ठेवून उकळते पानी घाला
  12. प्रथम मध्यम गॅसवर व नंतर मंद गॅसवर भाजी शिजवून घ्या ढेमसे मऊ झाले की भाजी तयार किंवा पातेले कूकर मध्ये ठेवून व शिट्ट्या घ्या
  13. कोथिंबीर घालून गरमागरम सर्व्ह करा

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर