मुख्यपृष्ठ / पाककृती / आळू ,चुक्याची भाजी

Photo of Aalu chukyachi bh by Arya Paradkar at BetterButter
29
2
0.0(0)
0

आळू ,चुक्याची भाजी

Nov-25-2018
Arya Paradkar
10 मिनिटे
तयारीची वेळ
20 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

आळू ,चुक्याची भाजी कृती बद्दल

हि एक पारंपारिक रुचकर सणावाराला आवर्जून केली जाणारी पौष्टिक भाजी, माझी आजी फार छान बनवायची, आंबट, गोड, तिखट चविचा अफलातून मिलाफ म्हणजे आळूची भाजी किंवा यास आळूचे फतफते देखील म्हणतात

रेसपी टैग

  • व्हेज
  • मध्यम
  • एव्हरी डे
  • महाराष्ट्र
  • मेन डिश
  • हाय फायबर

साहित्य सर्विंग: 4

  1. 7-8 आळूची पाने
  2. 1 छोटी चुक्याची जुडी
  3. 2-3 हिरव्या मिरच्या
  4. 10-12 खोबऱ्याचे पातळ काप
  5. 1/2 शेंगदाणे
  6. 2-3 चमचे बेसन पीठ
  7. मीठ चवीनुसार
  8. 1/2 भिजवलेली हरभरा डाळ
  9. 2 चमचे गोडा मसाला
  10. 1 चमचा तिखट
  11. 1 चमचा धणे जिरे पावडर
  12. 2-3 चमचे गुळ
  13. 1 चमचा मोहरी पाव चमचा हिंग
  14. 2-3 चमचे तेल

सूचना

  1. आळू चुक्याची भाजी निवडून धुवून घणे
  2. आळूची देठे सोलून घेणे व दोन्ही भाज्या चिरणे
  3. थोडे पाणी घालून दोन्ही भाज्या शिजवून घ्यावा
  4. हरभरा डाळ,खोबरे व शेंगदाणे शिजवून घ्यावे
  5. बेसन पीठ थोडे पाणी घालून चांगले मिक्स करावे
  6. एका कढईत तेल गरम करून त्यात मोहरी हिंग हळद कढीपत्ता घालून फोडणी करावी लगेच त्यात शिजवलेली भाजी चांगली हटून घालावी, शेंगदाणे, खोबरे, डाळ पण घालावी
  7. भाजीत सर्व मसाले व बेसन पीठ घालून चांगले मिक्स करावे व गुळ घालून चांगले खळखळून उकळणे
  8. आंबट ,गोड ,तिखट आशी चवदार भाजी तयार

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर