मुख्यपृष्ठ / पाककृती / चवळीची आमटी

Photo of Chavlichi aamti by Chayya Bari at BetterButter
909
4
0.0(0)
0

चवळीची आमटी

Nov-25-2018
Chayya Bari
15 मिनिटे
तयारीची वेळ
15 मिनिटे
कूक वेळ
3 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

चवळीची आमटी कृती बद्दल

आजीच्या हातची चवळीची आमटी अप्रतिमच म्हणूनच शिकून घेतली

रेसपी टैग

  • व्हेज
  • मध्यम
  • एव्हरी डे
  • महाराष्ट्र
  • बॉइलिंग
  • सौटेइंग
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 3

  1. चवळी 1वाटी
  2. कांदा 1
  3. खोबरे किस 4 चमचे
  4. धने 1चमचा
  5. कोथिंबीर
  6. आले लसूण पेस्ट 1चमचा
  7. तिखट 1चमचा
  8. हळद 1/2चमचा
  9. काळा मसाला 2चमचे
  10. जिरे,मोहरी,हिंग फोडणीसाठी
  11. तेल 4 चमचे
  12. गूळ चवीला
  13. चिंचेचा कोळ 1 चमचा
  14. मीठ चवीनुसार

सूचना

  1. प्रथम चवळी स्वच्छ धुवून कुकराला शिजवून घ्यावी
  2. कांदा,खोबरे किस,धने भाजून घ्यावे व त्यात कोथिंबीर घालून वाटण करावे
  3. तेल तापवून जिरे मोहरी हिंग घालून फोडणी करावी गॅस मंद करून तेलात आले लसूण पेस्ट परतावी मग तिखट,हळद,काळा मसाला ,चिंचेचा कोळ,मीठ व गूळ घालून मिक्स करावे व वाटण घालावे
  4. वाटण मिक्स करून तेल सुटेस्तीवर छान परतावे व शिजलेली चवळी घालावी
  5. मिक्स करून गरजेपुरते पानी घालावे आमटी छान उकळून घ्यावी
  6. गरमागरम पोळी,भाकरी,किंवा भाताबरोबर सर्व्ह करावी

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर