मुख्यपृष्ठ / पाककृती / मेथीचे भजी विथ वांगी बटाटे भाजी

Photo of Methi kabab with brinjal and potato sabji by seema Nadkarni at BetterButter
578
0
0.0(0)
0

मेथीचे भजी विथ वांगी बटाटे भाजी

Nov-25-2018
seema Nadkarni
40 मिनिटे
तयारीची वेळ
20 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

मेथीचे भजी विथ वांगी बटाटे भाजी कृती बद्दल

मेथीचे वेगवेगळे पदार्थ आजी आणि आई कडून शिकली.. मेथीची भजी ला मी भाजीत घालून नवीन पदार्थ बनवायचा प्रयत्न केला आहे.

रेसपी टैग

  • व्हेज
  • मध्यम
  • एव्हरी डे
  • प्रेशर कूक
  • फ्रायिंग
  • बेसिक रेसिपी

साहित्य सर्विंग: 4

  1. 1 जूडी मेथी
  2. 1 कप बेसनाची भरड
  3. 2 चमचा आले लसुण पेस्ट
  4. 1 चमचा हिरवी मिरची पेस्ट
  5. 1/4 कप दही
  6. 2 चमचा तेल
  7. 1 चमचा तीळ
  8. चवी पुरते मीठ
  9. 2 चमचा लाल तिखट
  10. 1/4 टि स्पून सोडा
  11. 1 कप चिरलेले बटाटे
  12. 1/2 कप चिरलेले वांगी
  13. 1/4 कप बारीक चिरलेला कांदा
  14. 1/4 कप बारीक चिरलेला टोमॅटो
  15. 2 चमचा लसुण पेस्ट
  16. 1 चमचा गरम मसाला
  17. चवी पुरते मीठ, लाल तिखट, हळद

सूचना

  1. सौ प्रथम मेथी साफ करून स्वच्छ धुवून घ्यावी. बारीक चिरून घ्यावे.
  2. त्यात चवीप्रमाणे मीठ, हळद, लाल तिखट, दही, तेल, आले लसुण पेस्ट, मिरची पेस्ट घालून एकत्र करावे.
  3. त्यात मावेल तितके बेसन ची भरड, थोडा सोडा घालून एकत्र करावे.
  4. या पीठा चे छोटे छोटे गोळे तयार करून घ्या.
  5. तेल तापवून त्यात तळून घ्यावे.
  6. अशा प्रकारे सगळे भजी तळून घ्यावे.
  7. आता एका कुकर मध्ये थोडे तेल घालून त्यात लाल सुक्या मिरच्या ची फोडणी करून त्यात आले लसुण पेस्ट घालून परतून घ्यावे.
  8. त्यात बारीक चिरलेला कांदा घालून ब्राऊन होईल तोपर्यंत परतून घ्यावे. त्यात बारीक चिरलेला टोमॅटो घालून एकत्र करावे.
  9. चांगले परतून झाले की त्यात थोडे दही घालून एकत्र करून घ्यावे
  10. आता त्यात चिरलेला बटाटे, वांगी व मेथी ची भजी ( कबाब) घालून एकत्र करावे.
  11. मेथीचे भजी घालून त्यात हळद, लाल तिखट, चवीपुरते मीठ व काळा मसाला घालून एकत्र करून घ्यावे. थोडे गरम पाणी घालून एक शिट्टी काढावी.
  12. वरून बारीक चिरलेली कोथिंबीर घालून सवँ करावे. या भाजी बरोबर तांदळाची, ज्वारी ची भाकरी खूप च छान लागते.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर