मुख्यपृष्ठ / पाककृती / धानाची खिचडी

Photo of Multigrain Khichadi by Tejashree Ganesh at BetterButter
607
1
0.0(0)
0

धानाची खिचडी

Nov-25-2018
Tejashree Ganesh
20 मिनिटे
तयारीची वेळ
20 मिनिटे
कूक वेळ
3 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

धानाची खिचडी कृती बद्दल

नेहमीच्या जेवणात सर्वप्रकारच्या धान्यांचा सामावेश करणे तसे अवघडच म्हणून की काय माझी आजी १५ दिवसांत एकदा तरी ही धानाची खिचडी करत असे.

रेसपी टैग

  • व्हेज
  • मध्यम
  • महाराष्ट्र
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 3

  1. तांदूळ १ कप
  2. गव्हले १/२ कप
  3. हिरवे मुग १ चमचा
  4. उडिद दाळ १ चमचा
  5. मसुर दाळ १ चमचा
  6. मुगदाळ १ चमचा
  7. तुरदाळ २ चमचे
  8. शेंगादाणे १/४ कप
  9. कांदा १
  10. टोमॅटो २
  11. वाटाणे,घेवडा, सिमला मिर्ची तुकडे १/२ कप
  12. गाजराचे काप १०-१२
  13. फ्लाॅवर चे तुकडे ६-७
  14. गोडामसाला २ चमचा
  15. हळद
  16. १ हिरवी मिरची बारिक चिरून (optional)
  17. आलं-लसून पेस्ट १ चमचा
  18. मिठ चविनुसार
  19. कोथिंबीर
  20. तेल २ चमचे.
  21. पाणी ६-७ कप

सूचना

  1. प्रथम गव्हले भाजून घेतले.
  2. सर्व धान्ये स्वच्छ धुवून वेगवेगळी १५-२० मि. भिजत ठेवली
  3. कांदा, टोमॅटो बारिक कापून घेतले.
  4. फ्लाॅवर, गाजर, सिमला मिरची व बिन्स चे तुकडे करून घेतले.
  5. वाटाणे सोलून घेतले.
  6. सर्व भाज्या कापून एका ताटात ठेवले.
  7. भजत ठेवलेले सर्व धान्या पाण्यातून काढून निथळत ठेवले.
  8. एका जाडबुडाच्या कढईमधे तेल टाकले, तेल तापल्यानंतर त्यात कांदा टाकला व गुलाबी रंगावर परतून घेतला.
  9. कांदा परतला की आलं-लसून पेस्ट टाकली. व चांगले परतून घेतले.
  10. त्यानंतर क्रमाने गाजर, बिन्स, फ्लाॅवर, सिमला मिर्ची, व शेंगादाणे टाकून परतून घेतले.
  11. ह्यानंतर क्रमाने गव्हले, तुरदाळ, मुगदाळ, मसूर दाळ, व शेवटी तांदूळ घालून २-३ मि. चांगले तेलात परतून घेतले.
  12. आता मसाला, मिरचीपुड ,हिरवी मिरची, मिठ टाकून पुन्हा व्यवस्थित हलवून घेतले. सर्व मिश्रण व्यवस्थित एकत्रित केले.
  13. बाजूला पाणी गरम होण्यास ठेवले.
  14. पाणी गरम झाले की ते वरिल मिश्रणात ओतले व पुन्हा एकदा एकत्रित करून घेतले.
  15. खिचडीला उकळी आल्यानंतर गॅस बरिक केला व झाकण ठेवून २० मि. शिजू दिले.
  16. वरून कोथिंबीर, कांद्याची पात व बिट ने garnish केले.
  17. ही खिचडी गरम गरमच serve करावी.
  18. तयार झालेल्या खिचडीवर गावरान तुप टाकून मस्त लागते.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर