Photo of Gool poli by seema Nadkarni at BetterButter
625
0
0.0(0)
0

गूळपोळी

Nov-25-2018
seema Nadkarni
35 मिनिटे
तयारीची वेळ
20 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

गूळपोळी कृती बद्दल

मला व माझ्या आजी ला गूळ पोळी खुप आवडायची.. बाकी घरात कोणाला आवडत नसे. आजी माझ्या साठी बनवायची पण आजी गेल्या पासून बनायला बंद झाले. मी मोठी झाल्यावर करायला शिकले.

रेसपी टैग

  • व्हेज
  • मध्यम
  • फेस्टिव
  • रोस्टिंग
  • डेजर्ट

साहित्य सर्विंग: 4

  1. 1 कप खिसलेला गूळ
  2. 1/2 कप शेंगदाण्याचे कूट
  3. 2 चमचा बेसन
  4. 1/2 कप कुटलेले तीळ
  5. 2 चमचा वेलची पूड
  6. 1 कप गव्हाचे पीठ
  7. 1 कप मैदा
  8. चवी पुरते मीठ
  9. लागल्यास थोडे पाणी

सूचना

  1. मैदा व गव्हाचे पीठ एकत्र करून त्यात तूपाचे मोहन घालून लागेल तसे पाणी घालून पीठ मळून घ्यावे.
  2. तीळ भाजून त्याची पूड करून घ्यावे.
  3. शेंगदाणे भाजून त्याची पूड करून घ्यावे.
  4. बेसन पीठ खमंग भाजून घ्यावे.
  5. गूळ चांगला खिसुन घ्यावे. त्यात शेंगदाण्याचे कूट, तीळकूट, बेसन पीठ व वेलची पूड घालून एकत्र करावे.
  6. सगळे जिन्नस एकत्र करून सारण तयार करावे.
  7. मैदा व गव्हाचे पीठ ची पारी तयार करून त्यात वरील सारण भरून पोळी लाटून घ्यावे. व तव्यावर भाजून घ्यावे.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर