मुख्यपृष्ठ / पाककृती / सांबारवडी रस्सा

Photo of Sambarvadi rassa by Chayya Bari at BetterButter
93
6
0.0(0)
0

सांबारवडी रस्सा

Nov-25-2018
Chayya Bari
30 मिनिटे
तयारीची वेळ
40 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

सांबारवडी रस्सा कृती बद्दल

खास वैदर्भीयन सांबार वडी शिवाय आजीच्या पाककृती पूर्ण होवूच शकत नाही.आजीच्या पाककृती मधील हा तर मानाचा तुरा.

रेसपी टैग

 • व्हेज
 • कठीण
 • डिनर पार्टी
 • महाराष्ट्र
 • बॉइलिंग
 • फ्रायिंग
 • सौटेइंग
 • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

 1. सारण- कोथिंबीर बारीक कापून 3 वाटी
 2. खोबरे किस 2वाटी
 3. तीळ 3चमचे
 4. खसखस 3चमचे
 5. चारोळी 1चमचा
 6. भाजलेले बेसन 1चमचा
 7. लिंबाचा रस 1चमचा
 8. साखर चवीला
 9. तिखट 1चमचा
 10. हळद 1/2चमचा
 11. गरम मसाला 1/2चमचा
 12. मीठ चवीनुसार
 13. कव्हर- बेसन 4वाटी
 14. तिखट 1चमचा
 15. हळद 1चमचा
 16. मीठ चवीनुसार
 17. तेल 2चमचे
 18. धने,जिरे पावडर 1चमचा
 19. रस्सा- कांदा 1
 20. खोबरे किस 4चमचे
 21. आले लसूण पेस्ट 1चमचा
 22. कोथिंबीर
 23. धने 2चमचे
 24. खसखस 1चमचा
 25. तेल तळण्यासाठी
 26. तेल फोडणीसाठी

सूचना

 1. प्रथम सारण बनवू कोथिंबीर थोडी कोमट कढईत टाकून हलवा व लगेच काढून घ्या
 2. आता बेसन भाजून काढून घ्या व तीळ, खसखस,खोबरे किस क्रमाने भाजा व अशी तयारी करा
 3. सर्व एकत्र करून सारण बनवा लिंबाचा रस साखर मिक्स करा सारण तयार
 4. आता बेसनात तिखट,मीठ,हळद,धनेजिरे पावडर व 2चमचे तेल घालून मिक्स करा व घट्ट भिजवून झाकून ठेवा
 5. आता रस्सा तयारी कांदा,खोबरे ,धने भाजून घ्या त्यात खसखस व कोथिंबीर घालून मिक्स रवर वाटण करा
 6. तेल तापवून त्यात जिरे मोहरी हिंग घालून फोडणी करावी मग त्यात आले लसूण पेस्ट घालून परतावे मग त्यात हळद तिखट मीठ गरम मसाला घालून परतावे आता त्यात वाटण घालून तेल सुटेपर्यंत परतावे
 7. आता गरजेप्रमाणे पानी घालून रस्सा उकळून बाजूला ठेवा
 8. आता भिजवलेल्या बेसनाचे पुरी लाटावी व त्यात सारण भरून सांबार वडी भरावी
 9. सर्व वड्या भरून घ्याव्या
 10. तेल तापवून त्यात प्रथम मध्यम गॅसवर व नंतर मंद गॅसवर खरपुस तळावी
 11. आता सर्व वड्या झाल्यावर रस्सा उकळत ठेवावे व सर्व्ह करण्याच्या 5 मिनिटे आधी रस्स्यात सोडून सर्व्ह करावे

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर