मुख्यपृष्ठ / पाककृती / भाकरी पिज्जा

Photo of BHAKRI Pizza by Jayshree Bhawalkar at BetterButter
68
4
0.0(0)
0

भाकरी पिज्जा

Nov-25-2018
Jayshree Bhawalkar
5 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

भाकरी पिज्जा कृती बद्दल

ही पाक कृती माझी आहे .माझी आजी थंडीत आम्हा नातवंडांनी भाकर खावी 2-3 पिठ मिसळून त्यात थोडे तीळ, तिखट,मिठ घालून मसाला भाकर बनवून द्यायची.मला अशी भाकर फार आवडायची.मी ह्या भाकरी ला इटालियन ट्वीस्ट दिला आहे.माझ्या मुलांना फार आवडला आणि त्यांनी हा पौष्टिक पिज्जा आवडीने फस्त केला.आज्जी जिंदाबाद.

रेसपी टैग

  • व्हेज
  • मध्यम
  • किड्स रेसिपीज
  • फ्युजन
  • रोस्टिंग
  • सौटेइंग
  • ब्रेकफास्ट आणि ब्रन्च
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. 1/2 कप ज्वारी च पिठ
  2. 1/2 कप बाजरी च पिठ
  3. 1/4 चमचा मिठ
  4. 1/4 कप उभा चिरलेला कांदा
  5. 1/4 कप बारीक चिरलेली हिरवी शिमला मिर्ची
  6. 1/4 कप गोल छोटे टमाटर चे काप
  7. 1/4 कप पिज्जा सॉस
  8. 1/2 चमचा ऑरेंगेनो
  9. 1/4 चमचा चिली फ्लेक्स
  10. 1 /4 कप किसलेलं प्रोसेस्ड चीझ
  11. 1 चमचा बटर
  12. 2 चमचे टोमॅटो सॉस

सूचना

  1. दोन्ही पिठ मिक्स करून मिठ घालून मळून घ्या.
  2. आता पोल पाटा वर भाकर थापून घ्या.मी बटर पेपर ठेवून भाकर थापत असते.
  3. भाकर गरम तव्यावर च आलटून पालटून भाजून घ्या. आंचे वर नाही भाजायची कारण आपण पिज्जा बनवतो आहे न.
  4. आता भाकरी ला एकीकडे बटर लावून घ्या .
  5. पालटून दुसऱ्या बाजू ला पिज्जा सॉस नीट पसरवून लावा.
  6. आता ह्या वर कांदा, शिमला मिर्ची चे काप, आणि टमाटर चे काप ठेवा .
  7. वरून किसलेलं चीझ पसरवा आणि चीझ वर ऑरेंगेनो,चिली फ्लेक्स भुरकवा.
  8. असा हा भाकरी पिज्जा बटर वाल्या बाजूने तव्यावर मंद आचेवर झाकून चीझ वितळे पर्यंत बेक करा.
  9. चीझ वितळल्या वर छान सरविंग प्लेट मधे टोमॅटो सॉस नी सजवून सर्व्ह करा.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर