मुख्यपृष्ठ / पाककृती / मोदकाची आमटी.

Photo of Modak Rassa. by Triveni Patil at BetterButter
962
4
0.0(0)
0

मोदकाची आमटी.

Nov-25-2018
Triveni Patil
45 मिनिटे
तयारीची वेळ
35 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

मोदकाची आमटी. कृती बद्दल

मोदकाच्या आमटी ला मसाला वांगी असे देखिल म्हटले जाते. तसेच माझी आजी या सारण मसाला घालून पुडाच्या पाटोळ्या करायी त्याला सातपुडाच्या पाटोळ्या असे ही म्हणत असे पण माला काही पीठ घेरुन पाटोळ्या करता येत नाही मग मी मोदकच करते.

रेसपी टैग

  • व्हेज
  • कठीण
  • इतर
  • महाराष्ट्र
  • बॉइलिंग
  • मेन डिश
  • हाय फायबर

साहित्य सर्विंग: 4

  1. सारणासाठी :-
  2. १.कांदे २ मध्यम किसुन.
  3. २.खसखस २ टे.स्पुन.
  4. ३.सुके खोबरे अर्धी वाटी किसुन.
  5. ४.धणेपूड १ टि.स्पुन.
  6. ५. लसुन १/२ पाकळ्या.
  7. ६.अद्रक अर्धा इंच.
  8. ७. मीरची पावडर दिड टे. स्पुन.
  9. ८. हळद पाव टे.स्पुन
  10. ९.गरम मसाला १ अर्धा टे.स्पुन.
  11. १०.मीठ चवीनुसार.
  12. मोदक पारीसाठी :-
  13. १.१ वाटी बेसन पीठ.
  14. २. २ टे.स्पुन तांदळाचे पीठ.
  15. ३. अर्धा टिस्पुन हळद.
  16. ४. १ टि.स्पुन लाल तिखट.
  17. ५. चवी पुरते मीठ.
  18. आमटी साठी :-
  19. १.कांदे ३ मध्यम बारिक कापुन .
  20. २.सुके खोबरे पाऊन वाटी किसुन.
  21. ३.धणेपूड १ टि.स्पुन.
  22. ४. लसुन ८/९ पाकळ्या.
  23. ५.अद्रक १ इंच.
  24. ६. लाल मीरची पावडर ३ टे. स्पुन.
  25. ७. गरम मसाला १ टे.स्पुन.
  26. ८.तेल एक वाटी.
  27. ९.मीठ चवीनुसार.
  28. १०. बारिक चिरलेली कोथिंबीर.

सूचना

  1. मोदकाचे सारण :-
  2. १. एक तवा गँसवर ठेवुन गरम झाला की किसलेला कांदा घालून परतावे कांदा लालसर परतला गेला की त्याच कांद्यावर किसलेला लसुन व किसलेले अद्रक परता मग खोबऱ्याचा किस टाकुन परता
  3. २. खोबरा किस लाल झाले की खसखस परता मग १ लाल तिखट, हळद, गरम मसाला घालून परतुन घ्या. व चवीपुरते थोडे मीठ घाला वरुन थोडं तेल घालून परतुन एका प्लेट मध्ये काढावे. थोडी बारिक चिरलेली कोथिंबीर घालावी.
  4. मोदकात भरन्यासाठी चा मसाला
  5. पारी साठी :-
  6. १.बेसनपीठ ,तांदळाचे पीठ , थोडे मीठ, तिखट, हळद, घालून मळून घेणे छोटासा गोळा [ सूपारी एवढा] करून पारी करणे. व वरील तयार केलेले सारण भरून मोदकाचा आकार देणे.
  7. तयार मोदक
  8. १. कांदा लांबट चिरुन तव्यावर लालासर भाजुन घ्या, कांदा भाजला गेला की प्लेट मध्ये काढुन खोबरा किस भाजा.
  9. २. भाजलेले सुके खोबरे व भाजलेला कांदा ,धणे , लसून, अद्रक ,जीरे , मिरची पावडर ,हळद , मिक्सर मध्ये थोडे पाणी घालून बारीक करून मसाला तयार करून घेणे.
  10. ३.कढईत सढळ हस्ते तेल घालून बारीक केलेला मसाला त्यात घालणे. खमंग वास सुटे पर्यंत परतत रहा. नंतर गरम मसाला घालणे. तेल सुटे पर्यंत परतून घेणे.
  11. ४. तेल सूटले की पाणी घालणे. उकळी आल्यावर तयार केलेले मोदक सोडणे. चवीला मीठ घालणे. १५ मिनीटे मोदक शिजू देणे.
  12. ५. कोथिंबीरने सजविणे. मस्त झणझणीत मोदकाची आमटी तयार. ( बाजरीची भाकरी ,पोळी ,भात) ह्या सोबत सर्व्ह करा.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर