मुख्यपृष्ठ / पाककृती / झुणका (पिठले)भाकरी

Photo of Zunaka(pithale) Bhakri by Chayya Bari at BetterButter
927
7
0.0(0)
0

झुणका (पिठले)भाकरी

Nov-25-2018
Chayya Bari
10 मिनिटे
तयारीची वेळ
25 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

झुणका (पिठले)भाकरी कृती बद्दल

झुणका भाकरी,कांदा,चटणी, लोणचं हा तर आजीच आवडता मेनू

रेसपी टैग

  • व्हेज
  • मध्यम
  • एव्हरी डे
  • महाराष्ट्र
  • बॉइलिंग
  • सौटेइंग
  • मेन डिश
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. बेसन 1वाटी
  2. कांदे 2
  3. हिरवी मिरची,आले लसूण 1चमचा
  4. कोथिंबीर
  5. तेल 4चमचे
  6. तिखट 2चमचे
  7. हळद 1चमचा
  8. जिरे,मोहरी,हिंग फोडणीसाठी
  9. मीठ चवीनुसार
  10. भाकरीसाठी बाजरीचे पीठ व मीठ

सूचना

  1. प्रथम कांदा कोथिंबीर कापून तयारी करावी
  2. तेल तापवून त्यात जिरे मोहरी हिंग घालून फोडणी करावी मग हिरवी मिरचीची तुकडे परतावे व कांदा घालून परतून घ्यावा आले लसूण पेस्ट घालून परतावे
  3. आता तिखट,मीठ,हळद घालून परतावे व उकळते पानी घालावे व त्यात एका हाताने बेसन टाकावे दुसऱ्या हाताने हलवत रहावे गोळे होवू देवू नये
  4. आता झाकण घालून मंद गॅसवर पिठले चांगले शिजू द्यावे
  5. अधून मधून हलवावे पिठले कडेला सुटले की झाले वरून कोथिंबीर घालून उतरून घ्यावे
  6. आता बाजरीच्या पिठात मीठ घालून गरम पाण्याने मलावे
  7. आता भाकरी थापून तव्यावर टाकावी वरून पानी लावावे
  8. मग पानी सुकले की भाकरी उलट करावी व तव्यावर ची बाजू नीट शेकावी
  9. आता तवा उचलुन दुसरी बाजू गॅसवर ठेवून भाकरी शेकावी
  10. गरमागरम झुणका(पिठले) भाकरी सर्व्ह करावी

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर