मुख्यपृष्ठ / पाककृती / खोकड्याचे कालवन

Photo of Crab Curry by Tejashree Ganesh at BetterButter
592
0
0.0(0)
0

खोकड्याचे कालवन

Nov-25-2018
Tejashree Ganesh
20 मिनिटे
तयारीची वेळ
30 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

खोकड्याचे कालवन कृती बद्दल

खेकड्याचे कालवनाची माझ्या आजीची रेसिपी.. अप्रतिम्..

रेसपी टैग

  • नॉन व्हेज
  • मध्यम

साहित्य सर्विंग: 2

  1. काळ्या पाठीचे खेकडे २
  2. कांदे २
  3. किसलेले सुके खोबरे १/२ कप
  4. आलं-लसून पेस्ट २ मोठे चमचे
  5. हळद
  6. लाल तिखट (चविप्रमाणे)
  7. हिरव्या मिरच्या २-३ (optional)
  8. घरचा लाल मसाला (चविप्रमाणे)
  9. तमालपत्र १-२
  10. मिरे ४-५
  11. लवंग २-३
  12. दालचिनी २ ईंच तुकडा
  13. मिठ
  14. तेल
  15. कोकमाचा गर १/४ कप
  16. कोखिंबीर
  17. काजू garnishing करिता

सूचना

  1. प्रथम खेकडे साफ करून घेतले.
  2. एका जाड बुडाच्या पातेल्यात तेल घालून कांदा चागंला भाजून घेतला.
  3. नंतर खोबरं भाजून घेतले.
  4. कांदा थंड झाला की मिक्सरमधे कांदा, खोबरं, हिरवी मिरची बारिक करून घेतले. व हे मिश्रण बाजूला काढून ठेवले.
  5. खेकड्याच्या बारिक नांग्या बाजूला काढून मिक्सरमधे थोडे पाणी घालून बारिक केले. हे मिश्रण पातळ झाले तरीही चालते.
  6. आता एका कढईमधे तेल तापवून त्यात सर्व खडा मसाला टाकला.
  7. आलं-लसून पेस्ट टाकली ती थोडी परतून घेतली.
  8. कांद्याचा मसाला टाकला व त्याला तेल सुटेपर्यंत तळून घेतले.
  9. नंतर ह्यामधे लाल तिखट, हळद, मिठ, लाल मसाला मसाला टाकून परतले.
  10. नंतर खोकडे टाकून परतून घेतले.
  11. आणि नांग्यांचे मिश्रण त्यात टाकून आवश्यकतेनुसार पाणी टाकून कालवन शिजत ठेवले.
  12. साधारण १५-२० मि. खोकड्याचे कालवन शिजलेले असते.
  13. कोथिंबीर व काजू टाकून serve करावे.
  14. हे कालवण तांदळाच्या भाकरीसोबत झक्कास लागते.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर