मुख्यपृष्ठ / पाककृती / बाजरे का खिचडा व कढी

Photo of Bajare ka khichada kadhi by Rohini Rathi at BetterButter
451
3
0.0(0)
0

बाजरे का खिचडा व कढी

Nov-25-2018
Rohini Rathi
15 मिनिटे
तयारीची वेळ
25 मिनिटे
कूक वेळ
3 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

बाजरे का खिचडा व कढी कृती बद्दल

ही पाककृती माझी आजी बनवायची तिची पद्धत वापरून मी ही बनवली आहे ही एक राजस्थानमधील पाककृती आहे

रेसपी टैग

  • Tossing (Mixing with a spoon / spatula)
  • व्हेज
  • सोपी
  • फेस्टिव
  • राजस्थान
  • बॉइलिंग
  • मेन डिश
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 3

  1. बाजरी एक कप
  2. मुंग डाळ तीन टेबलस्पून
  3. तांदूळ पाव कप
  4. मीठ चवीनुसार
  5. गावरान तूप एक कप
  6. कडी बनवण्यासाठी
  7. दही अर्धा कप
  8. बेसन पीठ एक टेबल स्पून
  9. तेल एक चमचा
  10. जीरे फोडणीसाठी
  11. 2 हिरव्या मिरचीचे तुकडे
  12. आले-लसणाची पेस्ट एक चमचा
  13. मीठ चवीनुसार

सूचना

  1. बाजरी मध्ये तीन ते चार चमचे पाणी घालून अर्धा तास भिजवून ठेवावी
  2. खलबत्त्यामध्ये भाजी घालून कुठावी म्हणजे त्यातील भुसा निघेल
  3. नंतर भुसा फटकून घ्यावा
  4. अशीच कुटण्याची पद्धत चार ते पाच वेळा करून घ्यावी
  5. प्रत्येक वेळेस बाजरीचा भुस्सा निघाल्यानंतर बाजरीचा मोठा रवा बनेल
  6. बाजरी मध्ये मुगाची डाळ तांदूळ एकत्र करून स्वच्छ धुवून घ्यावी
  7. कुकर मध्ये अर्धा कप तूप हिंग व चार कप पाणी टाकून उकळून घ्यावे
  8. खिचडीच्या मिश्रणात पाणी घातल्यानंतर कुकरमध्ये एक शिट्टी होईपर्यंत मोठ्या गॅसवर शिजवावे
  9. नंतर मध्यम आज करून वीस ते बावीस मिनिटे शिजवावे
  10. कुकर थंड झाल्यानंतर त्यामध्ये अर्धा कप तूप व मीठ घालून मिश्रण एकजीव करून घ्यावे
  11. नंतर परत अर्धा कप पाणी घालून मिश्रण घोटून चार ते पाच मिनिटे कमी आचेवर शिजवावे
  12. गरम खिचड्या वरती तूप व कढीबरोबर सर्व करावे
  13. कढी बनवण्यासाठी
  14. दह्यामध्ये एक टेबल स्पून बेसन पीठ मिसळून मिक्स करून मिश्रण बनवून
  15. पॅनमध्ये एक चमचा तेल गरम करून त्यात जिरे आल्याची पेस्ट व हिरवी मिरची घालून फोडणी घालावी
  16. तयार दही व बेसन पिठाचे मिश्रण घालून घ्यावे
  17. मिश्रणाला उकळी आल्यानंतर त्यात चवीनुसार मीठ व साखर घालावी
  18. गरम गरम खिचड्या याबरोबर कढी सर्व करावी

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर