मुख्यपृष्ठ / पाककृती / कळन्याची भाकरी हिरवी मिरची लसूण खर्डा ( ठेचा )

Photo of Kalnya chi Bhakari & Thecha. by Triveni Patil at BetterButter
52
3
0.0(0)
0

कळन्याची भाकरी हिरवी मिरची लसूण खर्डा ( ठेचा )

Nov-25-2018
Triveni Patil
30 मिनिटे
तयारीची वेळ
20 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

कळन्याची भाकरी हिरवी मिरची लसूण खर्डा ( ठेचा ) कृती बद्दल

मी पोळी बनवायला शिकन्या अगोदर भाकरी बनवायला शिकले ती पण चुल्हीवर माझी आजी भाकरी हातावर करायची ते कसब मला अजुनही अवगत नाही झाले, पण कळण्याची भाकरी आणी ठेचा हिवाळ्यात खुप भारी आहे.

रेसपी टैग

 • व्हेज
 • सोपी
 • इतर
 • महाराष्ट्र
 • शॅलो  फ्रायिंग
 • पॅन फ्रायिंग
 • बेसिक रेसिपी
 • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

 1. कळण्याची भाकरी साहित्य :-
 2. १. १ किलो. दादर किंवा ज्वारी.
 3. २. अख्खे उडिद पाव किलो.
 4. ३. जाड मीठ एक वाटी.
 5. खर्डा ( ठेचा )साहित्य :-
 6. १. हिरव्या मिरच्या १५/२०.
 7. २.आवडेल त्या प्रमाणात लसूण.
 8. ३. वाटीभर कोथिंबीर.
 9. ४. मीठ चवी प्रमाणे.
 10. ५.तेल.

सूचना

 1. भाकरी कृती : -
 2. १.सर्वात अगोदर दादर किंवा ज्वारी, उदीड व जाड मीठ एकत्र कालवून घ्यावे व चक्कीवरून मिडियम बारिक दळून आणावे (जाड मीठ उपलब्ध नसल्यास तयार कळण्याच्या पीठामध्ये बारीक मीठ कालवून घ्यावे ).
 3. २.तयार पिठाची भाकरी थापून चांगाली खरपूस भाजून घ्यावी.
 4. खर्डा कृती :-
 5. १.या खर्ड्यासाठी लोखंडी खोलगट तवा असल्यास उत्तम. तवा तापल की त्यावर मिरच्या आणि लसूण घालावे. व थोड तेल तेल घालावे.
 6. २.लसूण मऊ झाल्यावर मीठ घालून वाटी / दगडी बत्ता किंवा इतर उपल्ब्ध साधनांनी तव्यावरच खरडत ठेचत बारीक करावे झाकून एक वाफ काढावी.
 7. ४. एका कढल्यात २/३ डाव तेल घालून ३/४ पाकळ्य ठेचलेला लसुन घाला. लसुन लाल झाला की गँस बंद करा, फोडणीचे तेल तयार.
 8. ५. गरम गरम कळण्याच्या भाकरी वर ठेचा व त्या ठेच्या वर लसुनच्या फोडणीचे गरम गरम तेल घालुन सर्व्ह करा, स्वर्ग सुख.
 9. Eat With Smile :blush::blush::blush:

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर