मुख्यपृष्ठ / पाककृती / खानदेशी मसाला खिचडी.

Photo of Masala Khichdi. by Triveni Patil at BetterButter
919
1
0.0(0)
0

खानदेशी मसाला खिचडी.

Nov-25-2018
Triveni Patil
20 मिनिटे
तयारीची वेळ
25 मिनिटे
कूक वेळ
3 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

खानदेशी मसाला खिचडी. कृती बद्दल

खानदेशी मसाला म्हणजे गावाकडे प्रत्येक घरात रात्रीच्या जेवनात आवर्जुन असनारा सोपा पदार्थ, खिचडी चुल्हीवरची असेल तर विचारलाच नको.

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • इतर
  • महाराष्ट्र
  • प्रेशर कूक
  • बेसिक रेसिपी
  • एग फ्री

साहित्य सर्विंग: 3

  1. १.२.वाट्या तांदुळ - हा जाडच असावा.
  2. २.१वाटी दाळ- तुरीचीच असावी.
  3. फोडणीला :
  4. १.कांदा २ मध्यम आकाराचे बारीक चिरुन.
  5. २.१ बटाटा, मोठ्या फोडींमध्ये चिरुन.
  6. ३. मुठभर शेंगदाने.
  7. ४.१०/१५ लसुण पाकळ्या.
  8. ५. अर्धा इंच आलं.
  9. ६.अर्धी खोबर्याची वाटी.
  10. ७. कढिपत्ता.
  11. ८. १ टिस्पुन जिरं.
  12. ९.चिमुटभर हिंग.
  13. १०.एक टिस्पुन हळद.
  14. ११. अर्धा टे.स्पुन गरम मसाला.
  15. १२.२ ते ३ टे.स्पुन लाल तिखट.
  16. आणि हो....खिचडी कुकरला लावण्यापेक्षा पातेल्यात करावी (स्टीलचे नाही),छान मोकळी होते.

सूचना

  1. १.फोडणी देण्याआधी तुरीची दाळ बोटचेपी शिजवुन घ्यावी, त्यात पाणीही थोडे राहु द्यावे तेच पूर्ण खिचडी शिजायला कामात येते. (कूकरमधे होत नाही)
  2. २. लसुण, आलं खोबर व लाल तिखट मिक्सर मधुन फिरवुन लसुण खोबर्याची चटणी तयार करुन साईड ला ठेवा.
  3. ३.पातेल्यात तेल ओतुन गरम तेलात कढिपत्ता, जिरेमोहरीची फोडणी देऊन हिंग टाकुन कांदे परतवा कांदे गोल्डन ब्राऊन झाले कि चिरलेले बटाटे टाका, शेंगदाणे, हळद, मीठ, लसुण खोबर्याचे लाल तिखट टाकावे.
  4. ४. गरम मसाला, व मिठ घालुन मसाला छान परतु द्या या मसाल्याचा मस्त ठसकेदार वास यायला लागला की थोडे गरम पाणी टाकुन परत मसाला कलसवुन २ मिनिट झाकुन ठेवा.
  5. ५.कांदा छान नरम झाला की आधी तांदुळ धुवुन फोडणीत टाकावे..छान परतुन घ्यावे ..इतके की पातेल्याला चिकटतात. मग वरुन तुरीची दाळ +तीचेच पाणी वरुन ओतावे.
  6. ६.सर्व एकत्र निट कालवुन मिश्रणाच्या एक बोटभर पाणी वर राहील इतके पाणी हवे. आता गॅस जोरात करुन झाकण न ठेवता पाणी थोडे आटु द्यावे.
  7. ७.खिचडी थोडी आसट असतांना चिरलेली कोथिंबिर त्यात व्यवस्थित कालवुन वरुन घट्ट झाकण लावावे.
  8. ८.पाच मिनिटात खिचडी शिजते. आता गॅसवरच खाली तवा ठेउन पातेले त्यावर ठेवावे.गॅस मंद असावा म्हणजे खालची खरडही नंतर व्यवस्थित निघते.
  9. ९.खिचडी बरोबर कढी , हिरव्या मिरची चा ठेचा, किंवा मेथीच्या भाजीचा खुडा तोंडी लावायला छान लागतात.
  10. १०. मसाला खिचडी थोडी तेजच असावी असे मला तरी वाटते आणि मी तशीच बनवते तेज.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर