मुख्यपृष्ठ / पाककृती / बटाटा पराठे

Photo of Batata parathe by Ujwala Surwade at BetterButter
27
1
0.0(0)
0

बटाटा पराठे

Nov-26-2018
Ujwala Surwade
20 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
3 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

बटाटा पराठे कृती बद्दल

पराठा साधा म्हटला तरीही आजी छान च बनवायची .कधीतरी चहा सोबत पराठा मस्त लागत असे. तसाच एक बटाटा पराठा आणि लोणचं मस्तच लागत असे हल्ली मुल साँस बरोबर खातात.

रेसपी टैग

  • Tossing (Mixing with a spoon / spatula)
  • व्हेज
  • सोपी
  • इतर
  • महाराष्ट्र
  • शॅलो  फ्रायिंग
  • प्रेशर कूक
  • सौटेइंग
  • ब्रेकफास्ट आणि ब्रन्च
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 3

  1. 4बटाटे मोठे उकडलेले
  2. ५/६ हिरव्या मिरच्या
  3. कढीपत्ता
  4. कोथिंबीर
  5. आलं एक इंच
  6. लसूण पाकळ्या ८/९
  7. जिरं १टीस्पून
  8. मोहरी अर्धा टीस्पून
  9. तेल
  10. हळद
  11. मीठ
  12. दीड वाटी कणीक
  13. पाणी

सूचना

  1. कुकर मध्ये बटाटे टाकून ४/५ शिट्ट्या काढून घ्या
  2. नंतर मिरच्या ,कढीपत्ता ,कोथिंबीर ,आल लसूण मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्यावे
  3. कुकर गार झाल्यावर बटाटे सोलून मँश करून घ्यावे.
  4. नंतर पातेल्यात तेल घालून जिरं ,मोहरी वाटले ल वाटण हळद मीठ गरम मसाला घालून मँश केलेले बटाटे परतावे.
  5. नंतर कणीक ,मीठ तेल घालून पाण्याने मळून घ्यावे .
  6. नंतर दोन लाट्या करून घ्याव्या
  7. आणि त्या लाटून घेणे
  8. नंतर एका पूरीवर भाजी टाकून वरतून दुसऱ्या पुरीने बंद करून पराठा लाटून घेणे
  9. तयार पराठा दोन्ही बाजूने तेल लावून खरपूस भाजून घ्यावा
  10. अश्या प्रकारे सर्व पराठे करून गरमागरम खायला द्यावे .दही ,लोणचं सोबत

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर