मुख्यपृष्ठ / पाककृती / थालीपीठ (धपाटे)

Photo of Thalipith by SUCHITA WADEKAR at BetterButter
2379
1
0.0(0)
0

थालीपीठ (धपाटे)

Nov-27-2018
SUCHITA WADEKAR
15 मिनिटे
तयारीची वेळ
30 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

थालीपीठ (धपाटे) कृती बद्दल

थालीपीठ माझी आजी खूप सुंदर बनवायची. ते बनवताना सगळीकडे नुसता घमघमाट सुटायचा, त्या वासानेच खूप भूक लागायची. आजी, गरम गरम खरपूस भाजलेली थालीपीठ तव्यातून काढली कि ताटात वाढायची. चार थालीपीठ केव्हा पोटात जायची कळायचेच नाही. थालीपीठ भाजणी आजी स्वतः करून गिरणीतून दळून आणायची. या थलिपीठांणा माझ्या माहेरी 'धपाटे" असेही म्हणतात. या थालिपीठांसोबत आजी वाटल्या डाळीचा झुणका आणि दह्यातील साबुदाणा असा बेत असायचा. साबुदाणा ज्यांना आवडत नाही त्यांना नुसते दही दिले जायचे. ज्या ज्या वेळी मी थालीपीठ करते त्या त्या वेळी आजीची आठवण नक्की येते.

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • एव्हरी डे
  • महाराष्ट्र
  • ब्रेकफास्ट आणि ब्रन्च
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

  1. थालीपीठ भाजणी 2 वाटी
  2. कांदे 2
  3. हिंग अर्धा टी स्पून
  4. हळद अर्धा टी स्पून
  5. धने पावडर 1 टेबल स्पून
  6. जिरे पावडर अर्धा टेबल स्पून
  7. आख्खा ओवा 1 टेबल स्पून
  8. तीळ 2 टेबल स्पून
  9. हिरवे वाटण ---
  10. आलं अर्धा इंच
  11. लसूण 4 ते 5 पाकळ्या
  12. हिरवी मिरची 4 ते 5
  13. जिरे 1 टी स्पून

सूचना

  1. आलं, लसूण, हिरवी मिरची, जिरे आणि थोडंसं मीठ यांचे मिक्सरला वाटण करावे.
  2. एका घमेल्यात थालीपीठ भाजणी, कांदा, हिंग, हळद, धने पावडर, जिरे पावडर, आख्खा ओवा, तीळ व मिक्सर वर बारीक केलेल हिरवं वाटण घालावं आणि आवश्यक तेवढे मीठ घालावे.
  3. यानंतर यात भरपूर कोथिंबीर घालावी
  4. आणि पाणी घालून मळून घ्यावे
  5. कापडावर पाणी लावून थालीपीठ बनवावे.
  6. तव्यावर तेल सोडून त्यावर कापडावरील थालीपीठ घालावे आणि बाजूने तेल सोडून झाकण ठेवावे व गॅस बारीक करावा.
  7. पाच मिनिटांनी झाकण काढून थालीपीठ पलटी करावे व खरपूस भाजून घ्यावे.
  8. दही सोबत सर्व्ह करावे गरमागरम थालीपीठ !!

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर