मुख्यपृष्ठ / पाककृती / खपली गव्हाची खीर

Photo of Wheat grain kheer... by Suraksha Pargaonkar at BetterButter
1287
3
0.0(0)
0

खपली गव्हाची खीर

Nov-27-2018
Suraksha Pargaonkar
900 मिनिटे
तयारीची वेळ
60 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

खपली गव्हाची खीर कृती बद्दल

घरी गणेशोत्सवात आजी चुलीवर घोटून घोटून ही खीर बनवायची...मला मोदकांपेक्षा ही खीरच जास्त आवडायची..गूळ,बडीशेप यांचा घरभर सुवास पसरला की तोंडाला पाणी सुटायचे...

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • फेस्टिव
  • महाराष्ट्र
  • प्रेशर कूक
  • डेजर्ट
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. १ वाटी रात्रभर भिजवलेले खपली गहू
  2. पाऊण वाटी किसलेले गूळ
  3. १चमचा ओबडधोबड चेचलेली बडीशेप
  4. जायफळ पूड
  5. १/२ वाटी तूप
  6. पाव चमचा मीठ
  7. काजू बदाम काप
  8. बेदाणे

सूचना

  1. भिजवलेले गहू कुकरला लावून १० ते ११ शिट्या काढून मऊसूत शिजवून घ्या.
  2. एका पातेल्यात तूप गरम झाले की त्यात हे गहू घाला. व दूध,गूळ, बडीशेप, जायफळ पूड घालून मिसळून घ्या..
  3. गरज पडल्यास थोडे गरम पाणी घाला.
  4. बराच वेळ घोटत रहा.. एकसारखी झाली की त्यात ड्राय फ्रूट चे काप व बेदाणे घालुन पुन्हा थोडावेळ शिजू द्या.
  5. आवडीनुसार गरमागरम किंवा थंड सर्व्ह करा..

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर